Join us

Soybean Market today: सोयाबीन मार्केट थंडावले, प्रतिक्विंटल मिळतोय केवळ एवढा भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 27, 2024 4:00 PM

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज एकूण १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पिवळा,पांढरा आणि हायब्रीड अशा सर्व प्रकारच्या सोयाबीनला मिळणारा कमीत कमी भाव

 राज्यात सोयाबीन बाजारभावाची घसरण सुरुच असून बाजार थंडवल्याचे चित्र आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून साधारण ४३०० ते ४७०० प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

हिंगोली बाजारसमितीत ३७५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. प्रतिक्विंटल ४३४४ दराने सोयाबीनला भाव मिळाला. प्रजासत्ताकदिनामुळे बहुतांश बाजारसमित्यांमध्ये व्यवहार झाले नाहीत. परिणामी बाजार थंडावला होता. आज राज्यातील बाजारसमितीमध्ये एकूण १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

लातूरच्या बाजारसमितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४५०० रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. आज बाजारसमितीत १६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

तुरीकडून दिलासा सोयाबीनकडून निराशा

हमीभावापेक्षा कमीच दर

बहुतांश बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनला मिळणारा प्रतिक्विंटल दर हा हमीभावापेक्षा कमी असल्याचे दिसत आहे.सोयाबीनचा हमी भाव ४६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. सोयाबीन बाजार थंडावल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. मागील दोन आठवड्यांपासून दर पाच हजारांच्या खालीच असल्याने आहे त्या किमतीत सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Soybean Market Today: सकाळच्या सत्रात राज्यात ९९४ क्विंटल सोयाबिनची आवक, काय मिळाला भाव?

कोणत्या बाजारसमितीत किती दर मिळाला?

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज एकूण १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पिवळा,पांढरा आणि हायब्रीड अशा सर्व प्रकारच्या सोयाबीनला मिळणारा कमीत कमी भाव ४३०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल असाच आहे.

धाराशिव बाजारसमितीत आज ११० क्विंटल सोयाबीनची आवक झाली.सर्वसाधारण ४५०० रु प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर यवतमाळ जिल्हा बाजारसमितीत ३७० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. ४६०० रु प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे पणन विभागाने नोंदवले. 

जिल्हा

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

सर्वसाधारण दर

बीड

पिवळा

क्विंटल

50

4500

4530

छत्रपती संभाजीनगर

---

क्विंटल

23

4300

4312

छत्रपती संभाजीनगर

पिवळा

क्विंटल

10

4300

4300

धाराशिव

---

क्विंटल

110

4500

4500

धुळे

हायब्रीड

क्विंटल

39

4350

4370

हिंगोली

पिवळा

क्विंटल

375

4225

4344

जळगाव

पिवळा

क्विंटल

20

4525

4525

जालना

पिवळा

क्विंटल

46

4600

4700

लातूर

पिवळा

क्विंटल

160

4400

4500

नाशिक

पिवळा

क्विंटल

6

4380

4412

सातारा

पांढरा

क्विंटल

20

4700

4800

यवतमाळ

पिवळा

क्विंटल

370

4600

4620

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डलातूरहिंगोली