Join us

Soybean Market Today: धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनला मिळतोय एवढा भाव, उर्वरित बाजारसमितींची स्थिती कशी जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 3:11 PM

पहा पणन विभागाची माहिती..

राज्यात सध्या सोयाबीनची आवक होत असून शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी पुन्हा काढला आहे. आज राज्यात दुपारी ३ वाजेच्या सुमारास ८ हजार ५१८ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. अमरावती बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक हाेत असून तर धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनला शेतकऱ्यांना ४५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला.

अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ३५०० ते ४५०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. दरम्यान, धाराशिवमध्ये ५३ क्विंटल साेयाबीनला मिळणारा भाव ४५०० रुपयांचा होता. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४२७५ रुपये तर वाशिममध्ये ४२९० रुपयांचा भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/05/2024
अमरावतीलोकल6576435044604405
बुलढाणापिवळा4400044004400
चंद्रपुरपिवळा12300039003500
धाराशिव---45450045004500
धाराशिवपिवळा7452545254525
हिंगोलीलोकल804421545314373
हिंगोलीपिवळा63418043704275
परभणीपिवळा27450046004500
वर्धापिवळा80385043504150
वाशिम---300410044754290
यवतमाळपिवळा600440045004450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8518

टॅग्स :सोयाबीनबाजार