राज्यातील शेतकऱ्यांनी विविध बाजारसमितीत आज ४७२१ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. सर्वाधिक आवक अमरावती बाजारसमितीत झाली असून क्विंटलमागे शेतकऱ्यांना साधारण ४३०१ रुपये दर मिळाला.
राज्यात आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. शेतकऱ्यांना कमीत कमी ३५०० ते ४४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनच्या साठवणूकीलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात सोयाबीनची अधिक आवक असून मराठवाड्यातील आवक घटली आहे. जालन्यात ३५ क्विंटल तर धाराशिव जिल्ह्यात ७० क्विंटल सोयाबीन आज दाखल झाले.
जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
16/03/2024 | |||
अमरावती | 3759 | 4250 | 4301 |
बुलढाणा | 16 | 4350 | 4400 |
धाराशिव | 70 | 4450 | 4450 |
हिंगोली | 82 | 4200 | 4275 |
जालना | 35 | 4300 | 4350 |
नागपूर | 472 | 4100 | 4363 |
परभणी | 12 | 4300 | 4300 |
वर्धा | 95 | 3595 | 3990 |
यवतमाळ | 180 | 4400 | 4500 |