Join us

Soybean Market Update : सांगली बाजारात सोयाबीनला मिळाला 'हा' दर मिळाला; राज्यात कोणत्या बाजारात काय भाव मिळाला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 5:10 PM

आज राज्यातील बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update)

Soybean Market Update : 

केंद्र शासनाने तेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोयाबीनच्या दरात वर्षभरात पहिल्यांदाच वाढ झाली आहे. दरात तेजी आल्याने साठवणूक केलेले सोयाबीन बाजारात विक्रीला आले आहे. शिवाय नव्या सोयाबीनची भर पडत असल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. 

अर्ली व्हरायटीचे सोयाबीन आता बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यावर्षी शासनाने ४ हजार ८९२ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत मंगळवारी  ४ हजार  ते ५ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला आहे. आज  सांगलीच्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला.  किमान दर ४ हजार ९००   रूपये इतका होता तर कमाल दर ५ हजार २०० रूपये इतका होता तर सर्वसाधारण दर ५ हजार ५० इतके रूपये मिळाला.

राज्यातील बाजार समितीमध्ये गुरुवार (१९ सप्टेंबर) पासून सोयाबीनची आवक वाढली आहे. मागीलवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे मागणी वाढून सोयाबीनची दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.

प्रत्यक्षात सोयाबीनचे दर चार हजारांदरम्यान स्थिरावले होते. शिवाय शासन खरेदीही फारशी झालेली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेत सोयाबीनची साठवणूक केली होती. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलाच्या आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्यानंतर तेलाची दरवाढ झाली व सोयाबीनचे दर ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत.

सरासरी दराचा विचार केल्यास हमीभावापेक्षा क्विंटलमागे ५४२ रुपये कमी दर मिळाला. मागील वर्षी पाऊस, यलो मोझॅक व इतर कारणांमुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात घट झाली होती.

पावसाने वाढली शेतकऱ्यांची चिंता

सोयाबीनचा हंगाम सुरू होत असताना आता पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने उशिराच्या सोयाबीनला फायदा, तर कुठे नुकसान होत आहे.

९० दिवस शासन खरेदीची हमी

• केंद्र शासनाद्वारा हमीभावाने ९० दिवस सोयाबीनची खरेदी करण्यात येणार असल्याचे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

• मात्र, नव्या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शासन खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी होत नाही.

• शिवाय हंगाम संपल्यानंतर महिनाभराने केंद्रावर सोयाबीन खरेदीला सुरुवात करतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

• तोवर अडचणीतील शेतकरी मिळेल, त्या भावात सोयाबीनची विक्री करतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासन खरेदी केंद्राचा फायदा होत नाही. त्यामुळे शासनाने त्वरित खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

अशी झाली सोयाबीनच्या दरात वाढ

०६ सप्टेंबर४,४०० ते ४,४९१
०९ सप्टेंबर ४,३०० ते ४,४००
१३ सप्टेंबर ४,४५० ते ४,५५०
१८ सप्टेंबर४,५५० ते ४,६५६
२० सप्टेंबर४,४५० ते ४,५५०

राज्यातील सोयाबिन बाजारातील आजचे दर असे आहेत 

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/09/2024
जळगाव---क्विंटल119372545504260
कारंजा---क्विंटल4000414546104425
तुळजापूर---क्विंटल65450045004500
अमरावतीलोकलक्विंटल2859445045404495
सांगलीलोकलक्विंटल15490052005050
नागपूरलोकलक्विंटल71415044904405
चिखलीपिवळाक्विंटल295413044504290
बीडपिवळाक्विंटल118342540413736
वाशीमपिवळाक्विंटल3000427045774477
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600435046004450
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल16440045004450
भोकरपिवळाक्विंटल68355043413946
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल129440045004450
परतूरपिवळाक्विंटल73415045004350
किल्ले धारुरपिवळाक्विंटल4443044504450
किनवटपिवळाक्विंटल11430044004350
आर्णीपिवळाक्विंटल375400045464250
देवणीपिवळाक्विंटल70430046714485

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेतीसांगली