Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Moong Urad Registration : शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करून घ्या; कोणते कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर

Soybean Moong Urad Registration : शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करून घ्या; कोणते कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर

Soybean Moong Urad Registration : Farmers, register Moong, Udid, Soybean online; Read in detail what documents are required | Soybean Moong Urad Registration : शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करून घ्या; कोणते कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर

Soybean Moong Urad Registration : शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी करून घ्या; कोणते कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर

मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी आता सुरू झाली आहे. काय कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर (Soybean Moong Urad Registration)

मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी आता सुरू झाली आहे. काय कागदपत्र लागतील ते वाचा सविस्तर (Soybean Moong Urad Registration)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Moong Urad Registration :

बीड : खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेड मार्फत तालुकानिहाय १६ केंद्रांवर मूग, उडीद व सोयाबीन या पिकांची ऑनलाइन शेतकरी नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर स्वतः जाऊन ऑनलाइन नोंदणी करु शकतील. मूग, उडीद खरेदी १० ऑक्टोबरपासून व सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांनाच आपला शेतीमाल विकता येणार आहे.

हे कागदपत्र लागतील

* नोंदणीसाठी आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे छापील पासबुक द्यावे, त्यावर अकाउंट नंबर व आयएफएससी कोड स्पष्ट दिसला पाहिजे.

* ऑनलाइन पीक पेरा असलेला सातबारा उतारा घेऊन आपल्या पिकाची नोंदणी करावी लागेल.

* दरम्यान, सोयाबीन, उडीद, मूग नोंदणीसाठी तारखा दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यानुसार नोंदणी करुन घ्यावी लागणार आहे.

अशी आहे आधारभूत किंमत

मूग ८ हजार ६८२ रुपये प्रतिक्विंटल, उडीद ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल, सोयाबीन ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल असा भाव दिला जाणार आहे.
बीड जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रांना खालील प्रमाणे मूग, उडीद, सोयाबीन नोंदणी व खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.

या ठिकाणी होईल खरेदी

मोंढा मार्केट यार्ड अंबाजोगाई, अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संघ लि., किसान कृषी निविष्ठा सहकारी संस्था बर्दापूर, घाटनांदूर, आदित्य कृषी निविष्ठा सहकारी संस्था मर्या. हनुमंतवाडी अंबाजोगाई, जोगाईवाडी, वसुंधरा फळे भाजीपाला व फुले सहकारी खरेदी विक्री संस्था अंबाजोगाई, आष्टी मार्केट यार्ड कडा, जामगाव सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड जामगाव आष्टी, शिराळा किसान विकास सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या, शिराळ बीड, बहिरवाडी, भैरवनाथ कृषी निविष्ठा सर्वसाधारण सहकारी संस्था बहिरवाडी, बीड चौसाळा यशोदीप बहुद्देशिय सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. साखरे बोरगाव धारुर, मार्केट यार्ड धारुर किल्ले धारुर, तालुका खरेदी विक्री संघ धारुर, गेवराई मोंढा मार्केट यार्ड, तालुका खरेदी विक्री संघ गेवराई, केज तालुका सहकारी खरेदी विक्री संघ केज, ॲड. रामराव नाटकर कृषी निविष्ठा सहकारी संस्था माजलगाव परळी, ब्रम्हवाडी परळी,
तालुका सहकारी खरेदी विक्री संघ परळी, पाटोदा मोंढा मार्केट, पाटोदा तालुका कृषी प्रक्रिया सहकारी संस्था कुसळंब शिरुर, सिंदफणा शेतमाल पुरवठा व विक्री सहकारी संस्था मर्या. लोणी, वडवणी महालक्ष्मी बहुद्देशिय सर्व सेवा सहकारी संस्था मर्या या ठिकाणी मूग, सोयाबीन व उडदाची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: Soybean Moong Urad Registration : Farmers, register Moong, Udid, Soybean online; Read in detail what documents are required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.