राज्यातील सोयाबीनला हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता सोयाबीन साठवणूकीशिवाय पर्याय उरला नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, आज सकाळच्या सत्रात राज्यातील ७ बाजारसमितीत ६ हजार ७८७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी पिवळ्या सोयाबीनला सर्वसाधारण ४२००ते ४६२० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
मागील साधारण महिनाभरापासून सोयाबीनला ४००० ते ४६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणूकीला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात आवक घटल्याचे दिसून आले.
आज राज्यातील कोणत्या बाजारसमितीत झाली सोयाबीनची आवक?
अमरावती बाजारसमितीत लोकल सोयाबीनची आवक झाली. इतर बाजार समितींमध्ये पिवळा सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाला.
शेतमाल: सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
11/03/2024 | ||||
अमरावती | 6034 | 4150 | 4250 | 4200 |
धाराशिव | 75 | 4400 | 4400 | 4400 |
हिंगोली | 84 | 4200 | 4270 | 4235 |
जालना | 12 | 4100 | 4425 | 4250 |
नाशिक | 6 | 4290 | 4370 | 4350 |
परभणी | 6 | 3800 | 4351 | 4351 |
यवतमाळ | 570 | 4600 | 4650 | 4620 |