Join us

Soybean Rates : नव्याने आवक होत असलेल्या सोयाबीनला किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 8:05 PM

Maharashtra Soybean Rates : सोयाबीनची आवक मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून वाढली आहे. पण अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. 

यंदाच्या खरिपातील सोयाबीनची काढणी सुरू असून मागच्या हंगामातील आणि चालू हंगामातील सोयाबीन बाजारात आवक होताना दिसत आहे. सोयाबीनची आवक मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून वाढली आहे. पण अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, अहिल्यानगर, कोपरगाव, जामखेड या बाजार समित्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक होत आहे. आज राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ४ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आज सांगली बाजार समितीमध्ये ५ हजार रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता. तर भोकर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी म्हणजेच ३ हजार ५४१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे केवळ १४६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/10/2024
अहमदनगर---क्विंटल930390043504125
जळगाव---क्विंटल250392544204300
बार्शी---क्विंटल2910350045004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल197300042523626
नंदूरबार---क्विंटल11380043604075
संगमनेर---क्विंटल12420042254212
सिल्लोड---क्विंटल54390042504100
राहता---क्विंटल136391643514261
सोलापूरलोकलक्विंटल363330043304060
सांगलीलोकलक्विंटल100490051005000
नागपूरलोकलक्विंटल366410043114258
कोपरगावलोकलक्विंटल539356643664270
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल473420044004300
चाळीसगावपिवळाक्विंटल30362137653700
भोकरपिवळाक्विंटल146270043403541
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल105425043504300
जामखेडपिवळाक्विंटल533400043004150
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल80395042004100
मुखेडपिवळाक्विंटल74445045254450
उमरखेडपिवळाक्विंटल170460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल660460047004650

 

टॅग्स :मार्केट यार्डबाजारशेतकरीशेती क्षेत्र