Todays Soybean Rates : राज्यात खरिपाच्या पेरण्या शेवटच्या टप्प्यात असून अजूनही मागच्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्री केली नाही. बरेच शेतकरी सध्या बाजारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असून सोयाबीनला सध्या ४ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर आज राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमधील लिलाव बंद होते.
दरम्यान, आज राज्यातील सिल्लोड, औसा आणि बुलढाणा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली होती. येथे ७७ क्विंटल, ८८४ क्विंटल आणि १०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सिल्लोड बाजार समितीमध्ये ४ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.
औसा बाजार समितीमध्ये आज ४ हजार ४९६ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांमध्ये ४ हजार १५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. औसा आणि बुलढाणा या दोन बाजार समित्यांमध्ये पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती.
(Latest Soybean Rates)
आजचे सविस्तर सोयाबीनचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
14/07/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 77 | 4350 | 4400 | 4400 |
औसा | पिवळा | क्विंटल | 884 | 4375 | 4518 | 4496 |
बुलढाणा | पिवळा | क्विंटल | 100 | 4000 | 4300 | 4150 |