Join us

Soybean Rates Today : आज 'या' ३ बाजार समित्यांत झाली सोयाबीनची आवक! किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:24 PM

Market Yard Rates : राज्यात खरिपाच्या पेरण्या शेवटच्या टप्प्यात असून अजूनही मागच्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्री केली नाही.

Todays Soybean Rates : राज्यात खरिपाच्या पेरण्या शेवटच्या टप्प्यात असून अजूनही मागच्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्री केली नाही. बरेच शेतकरी सध्या बाजारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असून सोयाबीनला सध्या ४ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर आज राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमधील लिलाव बंद होते.

दरम्यान, आज राज्यातील सिल्लोड, औसा आणि बुलढाणा या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक झाली होती. येथे ७७ क्विंटल, ८८४ क्विंटल आणि १०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सिल्लोड बाजार समितीमध्ये ४ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

औसा बाजार समितीमध्ये आज ४ हजार ४९६ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांमध्ये ४ हजार १५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. औसा आणि बुलढाणा या दोन बाजार समित्यांमध्ये पिवळा या सोयाबीनची आवक झाली होती.(Latest Soybean Rates)

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/07/2024
सिल्लोड---क्विंटल77435044004400
औसापिवळाक्विंटल884437545184496
बुलढाणापिवळाक्विंटल100400043004150
टॅग्स :बाजारमार्केट यार्डसोयाबीन