सोयाबीनलाबाजारात दर मिळत नसल्याचे चित्र आहे, परंतू बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी बियाणांचे भाव वाढवले आहेत. शेतकऱ्यांचा माल स्वस्त घेऊन बियाणे महागाचे विकले जात असताना शासन मात्र गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले तर शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतमालाला भाव कमी मिळाले. सोयाबीन उत्पादकांनी घरी बियाणे तयार करण्याचे ठरवले. महागडी औषधे व खते न घेता पर्याय शोधला तर उत्पादन खर्च खूप कमी होऊ शकतो. सोयाबीन प्रमाणे कापूस उत्पादकांनी उत्पादन खर्च कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे.
शेतकऱ्यांनी कृषी विभागासह, कृषितज्ज्ञ, कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, असा सूर आता सर्वत्र आळवला जात आहे. जाहिरातीला बळी पडून शेतकरी चढ्या भावात बियाणे खरेदी करतो आहे. शासनाने ठरवलेल्या भावातच बियाणे खरेदी करावे, यासाठी कृषी विभागाने जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
शेतीविषयक अडचणींसाठी कृषी विभाग तत्पर आहे. अनावश्यक औषधोपचार टाळून शेती व पिकांचे आरोग्य जपावे. कधीही संपर्क केल्यास पूर्ण सहकार्य दिले जाईल. - अमोल बनसोडे, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर.
वाजवीपेक्षा जास्त भावाने बियाणे व खत विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी न घाबरता तक्रार करावी. त्यांना पकडून दिल्यास या लुटीला आळा बसेल. शेतकरी बांधवांना सहकार्य केले जाईल. - प्रशांत डिक्कर, सामाजिक कार्यकर्ता.
शेतकऱ्यांनी एकमेकांच्या सहकायनि व कृषी विभागाच्या मदतीने शेती करावी. अनेक उपचार घरगुती पद्धतीने करता येतात. शेती साक्षरता काळाची गरज आहे. - श्रीकृष्ण झाडोकार, शेतकरी, पातुर्डा खुर्द.
राज्यातील विविध बाजार समितींमधील रविवारी (दि.१६) सोयाबीन आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
16/06/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 13 | 4400 | 4400 | 4400 |
शेवगाव | पिवळा | क्विंटल | 8 | 4200 | 4200 | 4200 |
वरोरा | पिवळा | क्विंटल | 2 | 4000 | 4150 | 4100 |