Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीन स्थिर तर कांद्याचा 'पारा' चढता! जाणून घ्या आजचे बाजारभाव

सोयाबीन स्थिर तर कांद्याचा 'पारा' चढता! जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybeans rates are stable while onion rates rises today market price market yard | सोयाबीन स्थिर तर कांद्याचा 'पारा' चढता! जाणून घ्या आजचे बाजारभाव

सोयाबीन स्थिर तर कांद्याचा 'पारा' चढता! जाणून घ्या आजचे बाजारभाव

कांद्याचे दर वाढत असून टिकवणक्षमता असलेला आणि साठवून ठेवलेला कांदाही आता बाजारात येऊ लागला आहे.

कांद्याचे दर वाढत असून टिकवणक्षमता असलेला आणि साठवून ठेवलेला कांदाही आता बाजारात येऊ लागला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

दसऱ्याच्या नंतर कांद्याला चांगला दर मिळत असून सोयाबीनचे दर स्थिर असल्याचं चित्र आहे. सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी माल अजून बाजारात आणला नाही तर दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनसहित कापसाची आवक होणार आहे. कांद्याचे दर वाढत असून टिकवणक्षमता असलेला आणि साठवून ठेवलेला कांदाही आता बाजारात येऊ लागला आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क वाढवल्यानंतर कांद्याचे दर कमालीचे पडले होते. त्यानंतर पुन्हा केंद्र सराकराने कांद्यावरील निर्यात मूल्य वाढवल्यामुळे देशभरातील कांद्याच्या दराला चाप बसणार आहे. पण यानंतरही कांद्याला 'जरा बरे' दर मिळत असल्याचं चित्र आहे.

आज अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. तर सुरू असलेल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. सुरू असलेल्या पाच बाजार समित्यात सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रूपये दर मिळाला आहे. किमान दर ३ हजार ३०० तर कमाल दर ४ हजार ८५० रूपये एवढा मिळाला आहे. वरोरा बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ८११ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

दरम्यान, आज सुरू असलेल्या बाजारात उन्हाळी आणि लोकल कांद्याची आवक झाली होती. मागच्या काही दिवसांपासून कांद्याला बाजारात चांगले दर मिळत आहेत. आज सरासरी २ हजार ते ४ हजार ८०० रूपये एवढा दर मिळाला आहे. आळेफाटा (जुन्नर) बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार २५० एवढा  दर मिळाला असून पारनेर बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे १००० रूपये क्विंटर एवढा दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीन दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/10/2023
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल750400048004400
वरोरापिवळाक्विंटल811300046754300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल190330045504300
बुलढाणापिवळाक्विंटल636400047504600
देवणीपिवळाक्विंटल141474848854816

आजचे सविस्तर कांदा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/10/2023
दौंड-केडगाव---क्विंटल3175250060004500
सातारा---क्विंटल675200052003600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल10647200062504250
पुणेलोकलक्विंटल18795300054004200
पुणे- खडकीलोकलक्विंटल16300052004100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल43350060004750
पुणे-मोशीलोकलक्विंटल517200050003500
वाईलोकलक्विंटल10400060005000
कोपरगावउन्हाळीक्विंटल950200052544800
कोपरगावउन्हाळीक्विंटल3040210050004580
पारनेरउन्हाळीक्विंटल15474100060004200
भुसावळउन्हाळीक्विंटल14160025002000
रामटेकउन्हाळीक्विंटल10380040003900

Web Title: Soybeans rates are stable while onion rates rises today market price market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.