Join us

Soyeban Market : सोयाबीन वधारले तरी हमीभावाच्या अलीकडेच; आर्द्रता जास्त असल्याने दरामध्ये नरमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 12:15 PM

यावर्षी ९० दिवस सोयाबीनची हमीभावाने खरेदी शासन खरेदी होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील १८ केंद्रांवर १५ ऑक्टोबरपासून खरेदी सुरु होत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनची आवक कमी झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून जुन्या सोयाबीनला चमक आली व ४,००० रुपयांवर आलेले भाव एका दिवसात , ४,५०० रुपयांवर पोहोचले आहे. वर्षभर सोयाबीनला हमीभाव मिळालेला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने तेलाच्या आयात शुल्कावर २० टक्के वाढविल्याने सोयाबीनचे दर ४,७५० रुपये क्विंटलवर पोहोचले. मात्र, नव्या सोयाबीनची आवक सुरु होताच भाव एकदम ४,००० ते ४,२०० रुपयांवर आलेले आहे. अशा परिस्थितीत शासनाने ९० दिवस ४,८९२ रुपये हमीभावाने सोयाबीन खरेदीची ग्वाही शेतकऱ्यांना दिली व १ २ तारखेपासून ऑनलाइन नोंदणी व १५ र ऑक्टोबरपासून शासन खरेदी सुरु होणार आहे.

नव्या सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त

नव्या सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त असल्याने दरामध्ये कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नियमानुसार सोयाबीनमध्ये १३ टक्क्यांच्या वर आर्द्रता नको. मात्र, नव्या सोयाबीनमध्ये २० ते २२ टक्के आर्द्रता असल्याने याची खरेदी शासन केंद्रांवर होत नाही. खासगीमध्ये थोडाफार भाव यामुळे कमी होत असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे.

व्हीसीएमएफद्वारे मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे, अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, येवदा, कापूसतळणी, भातकुली व गणेशपूर या केंद्रांवर सोयाबीनची खरेदी होईल. सद्यस्थितीत या केंद्रांवर १५७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोयाबीन, मूग, उडदाची नोंदणी सुरु झालेली आहे. खरेदी सुरु करण्याच्या अनुषंगाने सर्व केंद्रांवर तयारी सुरु आहे. - अजय बिसने, जिल्हा विपणन अधिकारी.

हेही वाचा :  Varsha's Desi Cow Goshala : सेंद्रिय प्रकल्पातून गोशाळेला स्वयंअर्थपूर्ण करणाऱ्या वर्षाची वाचा प्रेरणादायी यशकथा

टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डबाजारअमरावतीविदर्भ