आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा येथील हळद बाजारात रमेश जाधव (आष्टा) यांच्या एक नंबर हळदीला चोवीस हजार पाचशे रुपये उच्चांकी दर मिळाला.
आष्टा येथील बाजार समितीच्या आवारात माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, सभापती संदीप पाटील, उपसभापती शिवाजी आपुगडे, विजय मोरे यांच्या हस्ते हळद सौद्याचे उद्घाटन झाले.
यावेळी संचालक बाळासाहेब इंगळे, विकास नांगरे, आबासाहेब पाटील, रघुनाथ साळुंखे, अनिल पावणे, शंकर मोहिते, विजय जाधव, राजेंद्र चव्हाण, माणिक देसावळे, नागेश देसाई यांच्यासह हळद असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा, प्रदीप नेमाने, अनिल नेमाने, अनिस पारेख, श्रीकांत सारडा, मनोहर कांते, राजकुमार कांते, जय जानी, अजित ढोले, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
झुंजारराव शिंदे म्हणाले, माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने आष्टा येथे हळद बाजार सुरू झाला. शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला दर मिळत असल्याने आष्टा हे हळद व्यवसायाचे केंद्र बनले आहे.
संदीप पाटील म्हणाले, आष्टा उप बाजारात हळदीला उच्चांकी दर मिळत असल्याने आष्ट्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रत्येक रविवारी सौद्याला हळद पाठवावी. बाळासाहेब इंगळे यांनी स्वागत केले. यावेळी सतीश माळी, संतोष पाटील, रघुनाथ शेळके, गुंडा मस्के, दीपक पाटील, प्रभाकर जाधव उपस्थित होते.
असा मिळाला दरएक नंबर हळदीला २४ हजार ५०० ते २० हजारदोन नंबर हळदीला २० हजारपासून १८ हजारकणी १३ हजार ५०० ते १४ हजार ५००चोरा २७ हजार ते २८ हजार