सध्या तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली असून तुरीच्या दरांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागच्या काही दिवसांत किमान दरही उतरल्याची चिन्हे आहेत. सध्या राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर १० हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळत आहे. तर किमान दर हे ७ हजारांच्या आसपास आहेत.
दरम्यान, आज पणन मंडळाच्या दुपारी ४ वाजेपर्यंतच्या अधिकृत माहितीनुसार, सकाळच्या सत्रात केवळ तीन बाजार समित्यांमध्ये तुरीचे लिलाव पार पडले. त्यामध्ये दौंड, जळकोट आणि शेवगाव या बाजार समित्यांचा सामावेश होता. तर दौंड बाजार समितीमध्ये लाल तुरीची १ क्विंटल आवक, जळकोट बाजार समितीमध्ये लाल तुरीची ५५७ क्विंटल आवक तर शेवगाव बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीची १५ क्विंटल आवक झाली होती. दौंड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ८ हजार ७५१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
तर जळकोट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे १० हजार ३७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. शेवगाव बाजार समितीमध्ये ९ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून आजच्या दिवसातील कमाल दर हा १० हजार ५६५ एवढा होता.
आजचे सकाळच्या सत्रातील तुरीचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
25/02/2024 | ||||||
दौंड | लाल | क्विंटल | 1 | 8751 | 8751 | 8751 |
जळकोट | लाल | क्विंटल | 557 | 10155 | 10565 | 10375 |
शेवगाव | पांढरा | क्विंटल | 15 | 7000 | 9700 | 9700 |