Join us

उद्या राज्याचा अर्थसंकल्प! आज सकाळच्या सत्रात तुरीच्या दर वाढले की कमी झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 4:21 PM

राज्यभरातील सकाळच्या सत्रात तुरीला किती मिळाला दर?

सध्या तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली असून तुरीच्या दरांनी १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागच्या काही दिवसांत किमान दरही उतरल्याची चिन्हे आहेत. सध्या राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर १० हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळत आहे. तर किमान दर हे ७ हजारांच्या आसपास आहेत. 

दरम्यान, आज पणन मंडळाच्या दुपारी ४ वाजेपर्यंतच्या अधिकृत माहितीनुसार,  सकाळच्या सत्रात  केवळ तीन बाजार समित्यांमध्ये तुरीचे लिलाव पार पडले. त्यामध्ये दौंड, जळकोट आणि शेवगाव या बाजार समित्यांचा सामावेश होता. तर दौंड बाजार समितीमध्ये लाल तुरीची १ क्विंटल आवक, जळकोट बाजार समितीमध्ये लाल तुरीची ५५७ क्विंटल आवक तर शेवगाव बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीची १५ क्विंटल आवक झाली होती. दौंड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ८ हजार ७५१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

तर जळकोट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे १० हजार ३७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. शेवगाव बाजार समितीमध्ये ९ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून आजच्या दिवसातील कमाल दर हा १० हजार ५६५ एवढा होता. 

आजचे सकाळच्या सत्रातील तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/02/2024
दौंडलालक्विंटल1875187518751
जळकोटलालक्विंटल557101551056510375
शेवगावपांढराक्विंटल15700097009700
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजार