कोल्हापूर: साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला तोपर्यंत घाऊक बाजारातील साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी दर कमी झाल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
एकरकमी एफआरपीसह इतर खर्चाचा ताळमेळ घालताना दमछाक होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साखरेच्या दरात फारशी चढउतार झाली नाही. दिवाळीत घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३५५० ते ३६०० रुपये दर होता.
पण, गेल्या दोन आठवड्यापासून साखरेच्या दरात घसरण होऊ लागली आहे. सध्या प्रतिक्विंटल ३३५० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. एफआरपी, हंगामाचा खर्च याची तोंडमिळवणी करताना कारखानदारांची दमछाक होणार आहे.
थंडीमुळे मागणी कमी झाल्याचा दावासध्या थंडीचा कडाका वाढला आहे, त्यामुळे आइस्क्रीम व थंडपेयांची मागणी कमी झाली आहे. परिणामी साखरेचा वापरही कमी झाल्याने दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्याऱ्यांचे म्हणणे आहे.
गरजेपेक्षा अधिक साखरकाही साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखर बाजारात आणली आहे. गरजेपेक्षा अधिक साखर बाजारात आल्यामुळे दर झपाट्याने घसरत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा: लाटवडेच्या शंकर पाटलांनी ऊस शेतीत केला ५५ कांड्याच्या उसाचा नवा रेकॉर्ड.. वाचा सविस्तर