Join us

साखरेला लवकरच ४२०० इतका हमीभाव मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:09 AM

साखरेची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ४,२०० रुपये लवकरच होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

साखरेची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ४,२०० रुपये लवकरच होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे संचालक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १०२ व्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी हर्षवर्धन पाटील हे वाळवा येथे सोमवारी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीबाबत पुढील दहा वर्षांचा रोड मॅप बनविला असून, साखर उद्योगात आमूलाग्र बदल केले जाणार आहेत.

उसाची एफआरपी वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नाहीत. त्यामुळे साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम तुटपुंजी पुजा असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे.

त्यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य प्रतिक्विंटल ४,२०० रुपये करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत केली होती.

टॅग्स :साखर कारखानेऊसकेंद्र सरकारसरकारअमित शाह