Join us

बाजारात उन्हाळ कांद्याची आवक घटली; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 4:12 PM

आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव असे आहेत.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात साडे तेरा हजार क्विंटल उन्हाळी कांंदा आवक होऊन सरासरी कांदाबाजारभाव ३४०० रुपये प्रति क्विंटल होते. लासलगाव विंचूर बाजारसमितीत सकाळच्या सत्रात ४ हजार क्विंटल कांदा आवक होऊन भाव सरासरी ३४५० होते. धुळे आणि जळगावला लाल कांद्याची थोड्या प्रमाणात आवक होत असून सरासरी २५०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळत आहे.

दिनांक १५ ऑक्टोबरपूर्वी संपलेल्या आठवड्यात लासलगाव बाजारात कांद्याचे सरासरी बाजारभाव २४६४ रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती कृषी विभागाच्या पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार या सरासरी बाजारभावात दोन आठवड्यापूर्वीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली आहे. एकूण देशभरातील कांदा आवकेत मागच्या आठवड्यात १६ टक्के घट झाली आहे.

आज दिनांक १७ ऑक्टो २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव पुढील प्रमाणे होते.

बाजार

समिती

जात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---7385100040002800

छत्रपती

संभाजीनगर

---1306120035002350

मुंबई

- कांदा बटाटा मार्केट

---8642160035002550
खेड-चाकण---750150040002500
कराडहळवा9980022002200
अकलुजलाल300100037003000
धुळेलाल4550035002500
जळगावलाल292115034002700
नागपूरलाल400200030002750
पुणेलोकल10699180040002900
पुणे -पिंपरीलोकल5320032003200

चाळीसगाव-

नागदरोड

लोकल700120035753000
वाईलोकल18100025002250
मंगळवेढालोकल6582033002400
कामठीलोकल4200030002500
येवलाउन्हाळी5000100037253150
येवला -अंदरसूलउन्हाळी250070037513250
लासलगावउन्हाळी5800155136113301
लासलगाव - विंचूरउन्हाळी4000200037013450
मालेगाव-मुंगसेउन्हाळी1100090035023100
सिन्नर - नायगावउन्हाळी98100035503300
मनमाडउन्हाळी300060034603100
पिंपळगाव बसवंतउन्हाळी13500160039603400
वैजापूर- शिऊरउन्हाळी332100040003300
देवळाउन्हाळी855045035003200
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार