संदीप झिरवाळ
नाशिकबाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडण्याला सुरुवात झाली असून बुधवारी (दि. १६) नाशिकबाजार समितीत कोथिंबीरला अवघा एक रुपया भाव मिळाल्याने शेतकऱ्यांवर कोथिंबीर फेकून देण्याची वेळ आली.
बुधवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या काही कोथिंबीर मालाला एक रुपया प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कोथिंबीर बाजार समितीत सोडून माघारी फिरावे लागले. महिन्याभरापूर्वी तब्बल सव्वाशे रुपये प्रति जुडी अशा दराने कोथिंबीर मालाची विक्री झालेली होती. मध्यंतरी पावसाची रिमझिम सुरु बाजारभावदेखील दोन ते तीन
असल्याने आठवडे तसेच टिकून होते.
गेल्या आठवड्यात कोथिंबीर ओलसर माल दाखल झाल्याने बाजारभाव घसरले होते. मात्र, बुधवारच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक आल्याने बाजारभाव ढासळले महिनाभरापूर्वी तीन अंकी दराने विक्री झालेल्या कोथिंबीर प्रति जुडीला एक रुपया असा दर मिळाल्याने लागवड खर्च तर सोडाच दळणवळण खर्चही सुटणार नसल्याचे लक्षात येताच नाराज झालेल्या शेतकरी बांधवांनी कोथिंबीर टाकून बाजार समितीतून काढता पाय घेतला. महिनाभरापूर्वी सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबीर बाजारभावाने आता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.
कांदापात तेजीत
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सायंकाळी झालेल्या लिलाव प्रक्रियेत कोथिंबीरला प्रति जुडी एक रुपया असाही मातीमोल बाजारभाव मिळाला. कोथिंबीर काही वक्कल्ला दोन हजार रुपये शेकडा (प्रति जुडी २० रुपये) दर मिळाला. बुधवारी कांदापात बाजारभावाने उच्चांकी गाठली कांदापात प्रति जुडीला ७० रुपये तर मेथी भाजीला २० रुपये असा बाजारभाव मिळाल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.