हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरातील काही शेतकरी पारंपरिक शेतीबरोबर चिंचेचे उत्पादनही घेऊ लागले असून, त्यांच्या चिंचेला तेलंगणा, आंध्र प्रदेशात मागणी वाढली आहे. सध्या चिंचेला प्रति क्विंटल ९ हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात यंदा चिंच चांगली बहरली आहे. चिंचेचे उत्पन्न शेतकऱ्यांना हातभार देऊ लागले आहे. फोडलेल्या चिंचेला ९ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. राज्यासह परराज्यात तालुक्यातील चिंच जात आहे. विशेष करून आंध्रा, तेलंगणात चिंचेला वाढती मागणी आहे. वसमत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चिंचेचे उत्पन्न घेतले आहे. तसेच काही शेतकऱ्यांकडे पिढ्यान पिढ्यांपासून चिंचेची झाडे आहेत.
दरवर्षी चिंच बहरते. यंदाही चिंच चांगल्या प्रमाणात आली आहे. ग्रामीण भागात चिंचेचे झाड लहान-मोठे व्यापारी खरेदी करतात. झाडावरची चिंच तोडून तिला २ ते ३ रुपये किलो दराने फोडले जाते. चिंचेतील चिंचुके वेगळे केले जातात. त्यानंतर चिंच विक्रीसाठी नेली जाते. सध्या नांदेड, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये चिंचेला ९ ते १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
एक चिंचेचे झाड देते १० हजार
यंदा चिंच चांगली फुटली आहे. गतवर्षीपेक्षा यावेळेस अनेक व्यापारी चिंचेसाठी आले होते. माझ्याकडे चिंचेची दोन मोठी झाडे आहेत. एक झाड १० हजाराला विक्री केले आहे. व्यापाऱ्याने झाडावरील चिंच तोडून नेली आहे. थोडा हातभार चिंचेमुळे मिळाला. - सय्यद समीर, शेतकरी
आंध्रात चिंचेला सर्वाधिक मागणी
तालुक्यातील चिंचेला सर्वत्र मागणी आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेशात चिंचेला चांगला दर व सर्वाधिक मागणी आहे. सध्या ९ ते १० हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. तालुक्यातील विविध भागातून चिच जमा करून विक्री करत आहोत. - करीम शेख, बागवान, वसमत
राज्यातील गेल्या आठवड्याच्या शेवटीचे शनिवार (दि. १६) चिंचेचे बाजारभाव व आवक
16/03/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 19 | 6500 | 9500 | 8000 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 170 | 1500 | 3500 | 2500 |
वैजापूर | --- | क्विंटल | 4 | 1855 | 2600 | 2150 |
शेवगाव - भोदेगाव | लाल | क्विंटल | 11 | 1500 | 1800 | 1500 |
जळगाव | लोकल | क्विंटल | 2 | 2500 | 2500 | 2500 |