Sweet Lime Market :
अनिलकुमार मेहेत्रे
पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये मृग बहार मोसंबी विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांनी मृग बहार मोसंबी विक्रीसाठी आणली असून, गुरुवारी ५० टन मोसंबी आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत घटल्यामुळे पैठण तालुक्यातील पाचोड येथील बाजारात गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रोजी चांगल्या दर्जाच्या मृग बहार मोसंबीला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिटन ३ ते ४ हजार रूपये जास्तीचा दर मिळाला आहे.
गेल्या वर्षी मोसंबीला प्रतिटन १३ हजार रूपयांचा दर मिळाला होता. मात्र यंदा हा दर १७ हजार रूपयांवर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मोठे मोसंबीचे मार्केट आहे.
मोसंबीची खरेदी करण्यासाठी दिल्लीसह मुंबई, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, राजस्थान या राज्यांतील व्यापारी पाचोडला येतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील शेतकरी येथे मोसंबी विक्रीसाठी आणतात. गुरुवारी या मार्केटमध्ये मोसंबीची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.
त्यावेळी ५० टन मोसंबीची आवक होती. लिलावात दर्जा खालावलेल्या मृग बहार मोसंबीला १३ हजार, तर चांगल्या प्रतीच्या मोसंबीला १७ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला. मागील वर्षी दर्जा खालावलेल्या मोसंबीला १० हजार, तर चांगल्या प्रतिच्या मोसंबीला १३ हजार रुपये दर मिळाला होता. याचाच अर्थ ३ ते ४ हजार रूपयांचा जास्तीचा दर यावर्षी मोसंबीला मिळाला आहे. मागील वर्षी येथील मोसंबी मार्केटमध्ये १० ते १५ लाख रुपयांची तर यावर्षी २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
आंबिया बहार मोसंबीला मिळतोय ५० हजारांचा दर
दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात येथील मार्केटमध्ये आंबिया बहार मोसंबी विक्रीसाठी येते. या मोसंबीला प्रतिटन ४० ते ५० दर मिळतो. यामुळे मृग बहार मोसंबीपेक्षा आंबिया बहार मोसंबीतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
गुरुवारी पाचोड येथील बाजारात ५० टन मोसंबीची आवक होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने मृग बहार मोसंबीला प्रतिटन ३ ते ४ हजार रूपये जास्तीचा दर मिळाला. दर्जा खालावलेल्या मोसंबीला १३ हजार, तर चांगल्या प्रतीच्या मोसंबीला सतरा हजार रुपये दर मिळाला आहे. - शिवाजी भालसिंगे, व्यापारी, पाचोड
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मोसंबीची किती आवक झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : मोसंबी
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|
28/11/2024 | ||||||
नाशिक | --- | क्विंटल | 70 | 1500 | 4000 | 3000 |
जळगाव | --- | क्विंटल | 10 | 2000 | 4000 | 3000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 40 | 1200 | 4500 | 2850 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 2810 | 2500 | 4000 | 3250 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 6 | 2500 | 4000 | 3000 |
कल्याण | हायब्रीड | क्विंटल | 3 | 4000 | 5000 | 4500 |
अकलुज | लोकल | क्विंटल | 5 | 4000 | 5000 | 4500 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 20 | 2000 | 6200 | 4000 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 121 | 2200 | 2600 | 2400 |
पुणे | लोकल | क्विंटल | 210 | 2500 | 5800 | 4100 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 6 | 4000 | 4000 | 4000 |
नागपूर | नं. १ | क्विंटल | 10 | 3800 | 4500 | 4325 |
जालना | नं. २ | क्विंटल | 59 | 550 | 3300 | 1800 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)
हे ही वाचा सविस्तर
Crop Management : गहू, हरभरा, मका पिकासाठी पाण्याच्या पाळ्या किती आणि कधी द्याल? वाचा सविस्तर
https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/latest-news-crop-management-planning-of-water-cycles-for-wheat-gram-maize-crops-read-in-detail-a-a993/ #google_vignette