Join us

बाजारात गोड गोड कलिंगडाची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:48 AM

किरकोळ बाजारात कलिंगडाचा दर आकारानुसार ४० ते २२० रुपयापर्यंत आहे. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते.

उन्हाळ्याची चाहूल लागताच पनवेल परिसरातील बाजारपेठेत कलिंगडाची आवक वाढली आहे. वाढलेला उन्हाळा, रमजानचा महिना यामुळे गोडव्यासह थंडावा देणाऱ्या कलिंगडाला मागणीही वाढली आहे.

किरकोळ बाजारात कलिंगडाचा दर आकारानुसार ४० ते २२० रुपयापर्यंत आहे. नवीन पनवेल, पनवेल, आदई सर्कल, कळंबोली मार्गावर कलिंगड विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे सरबतासोबतच कलिंगडाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

कलिंगडाचा हंगाम बहरात आल्यानंतर आवक आणखी वाढेल. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. त्यामुळे फळ विक्रेते, तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून याला मागणी मोठ्या प्रमाणात असते, त्याचबरोबर घरगुती ग्राहक छोठ्या आकाराचे निफाड, बेबीशुगर या जातीचे कलिंगड खरेदी करतात.

कलिंगडाचा हंगाम मार्चपासून सून सुरू होत असून तो जून महिन्यापर्यंत यापर्यंत सुरु असतो. पनवेल परिसरात महाड तसेच घाटमाथ्यावरुन कलिंगड विक्रीसाठी येतात. उन्हाचा चटका वाढत असल्यानेही कलिंगडाला मागणी वाढली आहे. तसेच कलिंगडाच्या खापा करून त्याची विक्री केली जात आहे, लहान तसेच मोठी एक खाप २० ते २५ रुपयांना विकली जात आहे.

दिवसागणिक वाढतोय उन्हाचा पारा- उन्हाचा तडाखा वाढतोय पाहत उन-सावलीचा खेळही आता संपत आला आहे. भर दुपारी ऊन चांगलेच तापत आहे.- परिणामी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धापूर्वीच तापमान ३६ अंशांवर जाऊ लागले असून जीवाची लाहीलाही होत आहे.- या उन्हात शीतपेय, उसाचा रस, थंड असणाऱ्या फळांना मागणी वाढली आहे. होळीच्या सणानंतर तापमानात वाढ होत असली, तरी यंदा मात्र होळी जाळण्यापूर्वीच दिवसागणिक तापमानाचा पारा वाढत आहे.

मार्केटमध्ये होलसेल बाजारात किलोप्रमाणे कलिंगडाची विक्री केली जात आहे. यामध्ये कलिंगडाचे दर प्रतवारीनुसार ४० ते २२० पर्यंत आहेत. अख्ख्या कलिंगडापेक्षा कलिंगडाच्या खापा करून त्या विकल्या जात असून त्यातून चांगले पैसे मिळतात. - सुरेश यादव, फळ विक्रेता

टॅग्स :बाजारमार्केट यार्डनवी मुंबईफळेतापमान