Lokmat Agro >बाजारहाट > तासगाव बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ; कसा मिळाला बाजारभाव

तासगाव बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ; कसा मिळाला बाजारभाव

Tasgaon Market Committee arrival season new raisins; How did you get the market price? | तासगाव बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ; कसा मिळाला बाजारभाव

तासगाव बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ; कसा मिळाला बाजारभाव

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल ११० टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी २११ रुपये दर मिळाला.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल ११० टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी २११ रुपये दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल ११० टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी २११ रुपये दर मिळाला.

जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या हस्ते सौद्याचा प्रारंभ करण्यात आला. सहायक निबंधक रंजना बारहत्ते, बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, बाजार समितीचे उपसभापती, रामचंद्र जाधव, संचालक रवींद्र पाटील, खंडू पवार, अनिल पाटील, अंकुश माळी, सुदाम माळी, कुमार शेटे, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी सहायक सचिव, चंद्रकांत कणसे उपस्थित होते, उपस्थित होते.

न्यू जानसी ट्रेडर्समध्ये आमसिद्ध शिवाप्पा सोरडी या शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्यास किलोला २११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंगमध्ये लिंगाप्पा सोमलिंग यांच्या बेदाण्यास किलोला २०१ रुपये दर मिळाला.

बाजार आवारात एकूण २५ अडत दुकानात ११० टन नवीन हिरव्या बेदाण्याची आवक होऊन विक्री झाली. त्याचे सरासरी दर किलोला ९० ते २११ रुपये मिळाला. पिवळ्या बेदाण्यास प्रति किलो ८७ ते १७५ रुपये दर मिळाला.

Web Title: Tasgaon Market Committee arrival season new raisins; How did you get the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.