Join us

तासगाव बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ; कसा मिळाला बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 1:06 PM

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल ११० टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी २११ रुपये दर मिळाला.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नवीन बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी तब्बल ११० टन बेदाण्याची विक्री झाली किलोला उच्चांकी २११ रुपये दर मिळाला.

जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या हस्ते सौद्याचा प्रारंभ करण्यात आला. सहायक निबंधक रंजना बारहत्ते, बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, बाजार समितीचे उपसभापती, रामचंद्र जाधव, संचालक रवींद्र पाटील, खंडू पवार, अनिल पाटील, अंकुश माळी, सुदाम माळी, कुमार शेटे, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी सहायक सचिव, चंद्रकांत कणसे उपस्थित होते, उपस्थित होते.

न्यू जानसी ट्रेडर्समध्ये आमसिद्ध शिवाप्पा सोरडी या शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्यास किलोला २११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंगमध्ये लिंगाप्पा सोमलिंग यांच्या बेदाण्यास किलोला २०१ रुपये दर मिळाला.

बाजार आवारात एकूण २५ अडत दुकानात ११० टन नवीन हिरव्या बेदाण्याची आवक होऊन विक्री झाली. त्याचे सरासरी दर किलोला ९० ते २११ रुपये मिळाला. पिवळ्या बेदाण्यास प्रति किलो ८७ ते १७५ रुपये दर मिळाला.

टॅग्स :बाजारसांगलीशेतकरीद्राक्षेमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती