Lokmat Agro >बाजारहाट > तुरीच्या भावात उसळी, अकोला, वाशिममध्ये दहा हजारांचा दर 

तुरीच्या भावात उसळी, अकोला, वाशिममध्ये दहा हजारांचा दर 

Ten thousand rate in Usli, Akola, Washim in Turi price | तुरीच्या भावात उसळी, अकोला, वाशिममध्ये दहा हजारांचा दर 

तुरीच्या भावात उसळी, अकोला, वाशिममध्ये दहा हजारांचा दर 

राज्यातील काही बाजार समित्यांत तुरीच्या भावात चांगलीच उसळी पाहायला मिळाली

राज्यातील काही बाजार समित्यांत तुरीच्या भावात चांगलीच उसळी पाहायला मिळाली

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील काही बाजार समित्यांत तुरीच्या भावात चांगलीच उसळी पाहायला मिळाली आणि तुरीच्या भावाने 10 हजारांचा टप्पा ओलांडला. आठवड्यात खरेदीच्या शेवटच्या दिवशी तुरीच्या भावात ही तेजी दिसून आली असली तरी पुढच्या आठवड्यात भावातील ही तेजी टिकून राहणार का, ते पाहूनच शेतकऱ्यांनी तूर विक्रीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.

देशांतर्गत यंदा तुरीचे उत्पादन घटले आहे. अशातच केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बाजारभावाने खुल्या बाजारात तूर खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच यंदा केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सात हजार रुपये प्रतिक्विंटल या हमीभावापेक्षा अधिकच्या दरात शासनाच्या माध्यमातून तूर खरेदी होणे अपेक्षित आहे. यामुळे काही व्यापाऱ्यांनी आणि तूर बाजारातील अभ्यासकांनी लवकरच तुरीचे बाजार भाव 11 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचतील, अशी आशा व्यक्त केली आहे. 

अकोला, हिंगोली, वाशीम जिल्ह्यातील बाजार समित्यांत शुक्रवारी तुरीचे भाव 10 हजार रुपयांवर पोहोचले. वाशिम बाजार समितीत तुरीला कमाल 10 हजार 70 रुपये प्रति क्विंटल, तर कारंजा बाजार समितीत तुरीला कमाल 10 हजार 400 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे भाव मिळाले, उत्पादनात आलेली घट आणि शासनाने बाजारभावातील खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय पाहता तुरीचे बाजार भाव 11 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील, असे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात दरवाढीचा अंदाज घेवुन टप्प्याटप्याने तुरीची विक्री करणेच योग्य ठरणार आहे.

उत्पादनात मोठी घट 
यंदा तुरीच्या उत्पादनात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत घट येईल, अशी भीती काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. खरीप हंगामात झालेला कमी पाऊस आणि हवामान बदल या कारणांमुळे तुरीकर विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा घटलेले तुरीचे उत्पाटन, त्यामुळे स्टॉकिस्टची खरेदी आणि सरकारकडून बाजारभावाने तूर खरेदीची तयारी सुरू असल्याने तुरीच्या भावात पुन्हा सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला असून, बाजार समित्यात आताच तसे चित्र पाहायला मिळत आहे.

तुरीच्या दरात तेजीची शक्यता 

कारंजा येथील व्यापारी प्रवीण साबु म्हणाले की, यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच केंद्र सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतल्याने तुरीच्या दरात आणखी तेजीची शक्यता आहे. दुसरे व्यापारी बिहारी जयराज म्हणाले की, यंदा खरीप हंगामातील तुरीच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीला मागणी आहे. उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे चित्र असल्याने आगामी दिवसांत तुरीचे दर वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 10 हजारांच्यावर भाव मिळाला. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…
 

 

Web Title: Ten thousand rate in Usli, Akola, Washim in Turi price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.