बाजारात आता आंब्याप्रमाणे फणसाची आवक वाढली आहे. पिंपरी फळबाजारात कापा फणस ४०० ते ५०० रुपयाला एक विकला जात आहे. तर कापा फणसाचे काढलेले गरे २०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
कापा फणसाला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. उन्हाळ्यात आंबा, कलिंगड, द्राक्षे ही फळे खाण्याची जितकी उत्सुकता असते, तितकीच फणसाचीही असते. गोड चव, आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.
कोकणातील आंबा, काजूबरोबरच फणसदेखील प्रसिद्ध आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात फणस विक्रीसाठी बाजारात यायला सुरुवात झाली. पिंपरी बाजारात कापा फणस ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. फणसाचे काढलेले गरे २०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
फणस ५०० रुपयांना
एक फणस ८ ते १६ किलोचा असल्यामुळे साधारणतः एक फणस ४०० ते ५०० रुपयांना मिळतो. बाजारातून गरे विकत घेत जात आहे.
अधिक वाचा: मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव