Lokmat Agro >बाजारहाट > सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली, काय मिळतोय भाव?

सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली, काय मिळतोय भाव?

The arrival of maize decreased in the morning session, what is the price? | सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली, काय मिळतोय भाव?

सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली, काय मिळतोय भाव?

पणन विभागाच्या आकडेवारीनुसार आज सकाळच्या सत्रात मक्याची आवक मंदावली आहे.

पणन विभागाच्या आकडेवारीनुसार आज सकाळच्या सत्रात मक्याची आवक मंदावली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळच्या सत्रात मक्याची आवक घटली आहे. मागील दोन दिवसात दररोज साधारण २० ते  ३० हजार क्विंटल मक्याची बाजारात आवक होत आहे. यावेळी सर्वसाधारण २००० ते २५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

गुरुवारी राज्यात सकाळच्या सत्रात एकूण ३९४ क्विंटल मक्याची आवक झाली होती. यावेळी  लाल, पिवळी, लोकल जातीचा मका बाजारात विक्रीसाठी आला होता. सर्वाधिक आवक मुंबईमधून होत असून ३३३ क्विंटल आवक गुरुवारी झाली होती.

दरम्यान आज सकाळच्या सत्रात जळगाव बाजारसमितीत ३३ क्विंटल लाल तर बुलढाणा जिल्ह्यात २५ क्विंटल मक्याची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण २०५० ते ३५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये ३९४ क्विंटल मक्याची आवक झाली. पणन विभागाच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सर्वसाधारण २००० ते ३५०० रुपयांचा भाव मिळत आहे. अमरावती बाजारसमितीत ३ क्विंटल मक्याला सर्वसाधारण २०५० रुपयांचा भाव मिळाला.

Web Title: The arrival of maize decreased in the morning session, what is the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.