गेल्या काही दिवसांपासून तुरीला चांगला बाजारभाव मिळत असताना दहा हजारांवर गेलेली तूर पुन्हा खाली येऊ लागली आहे. तर सोयाबीन अद्यापही हमीभावाच्या खालीच खरेदी केला जात आहे. आजचे बाजारभाव पाहिले असता तुरीला नऊ हजार तर सोयाबीनला चार हजार दोनशे सरासरी बाजारभाव मिळाला आहे.
तुरीचे आजचे बाजारभाव
आज रविवार असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. काही बाजार समित्या सुरू होत्या. त्यानुसार सिल्लोड बाजार समितीत पाच क्विंटल तुरीची आवक झाली. या बाजार समिती प्रतिक्विंटल कमीत कमी 08 हजार 800 रुपये तर सरासरी 8900 बाजार भाव मिळाला. देवणी बाजार समिती 43 क्विंटल तुरीची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 9600 रुपये तर सरासरी 9753 रुपये दर मिळाला. वरोरा बाजार समितीत लाल तुरीची 25 क्विंटल आवक झाली तर कमीत कमी 7 हजार 700 रुपये दर मिळाला. तर सरासरी 08 हजार 200 रुपये दर मिळाला. जळकोट बाजार समितीत सर्वाधिक 549 क्विंटल ची आवक झाली तर कमीत कमी दर 9425 रुपये तर सरासरी दर 9871 रुपये मिळाला. मांढळ बाजार समितीत 11 क्विंटल चे आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 08 हजार 400 रुपये तर सरासरी 08 हजार 800 रुपये दर मिळाला.
सोयाबीनचे आजचे बाजारभाव
सोयाबीनचे देखील आज आवक कमी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार आज सिल्लोड बाजार समिती केवळ दहा क्विंटल झाली. या बाजार समितीत कमीत कमी 04 हजार पाचशे रुपये तर सरासरी 04 हजार पाचशे रुपये दर मिळाला जळकोट बाजार समितीत 297 क्विंटल पांढरा सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 04 हजार तीनशे रुपये तर सरासरी 4 हजार 500 रुपये दर मिळाला. वरोरा बाजार समितीत चाळीस क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 04 हजार 100 रुपये तर 4200 सरासरी दर मिळाला. सिंदखेड राजा या बाजार समितीत 325 क्विंटल ची आवक झाली कमीत कमी 04 हजार 600 रुपये दर मिळाला. तर सरासरी 4 हजार 425 रुपये दर मिळाला. देवणी बाजार समितीत 27 क्विंटल ची आवक झाली. कमीत कमी 04 हजार 400 आठशे रुपये तर सरासरी 4996 रुपये दर मिळाला.
आजचे तुरीचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
28/01/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 5 | 8800 | 8900 | 8900 |
देवणी | --- | क्विंटल | 43 | 9600 | 9906 | 9753 |
वरोरा | लाल | क्विंटल | 25 | 7700 | 8700 | 8200 |
जळकोट | लाल | क्विंटल | 549 | 9425 | 10050 | 9871 |
मांढळ | लोकल | क्विंटल | 11 | 8400 | 9150 | 8800 |
आजचे सोयाबीनचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
28/01/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 10 | 4500 | 4500 | 4500 |
जळकोट | पांढरा | क्विंटल | 297 | 4300 | 4600 | 4450 |
वरोरा | पिवळा | क्विंटल | 40 | 4100 | 4351 | 4200 |
वरोरा-खांबाडा | पिवळा | क्विंटल | 19 | 1900 | 4100 | 4000 |
सिंदखेड राजा | पिवळा | क्विंटल | 325 | 4600 | 4650 | 4625 |
देवणी | पिवळा | क्विंटल | 27 | 4418 | 4575 | 4496 |