Join us

बेदाणा उधळणीची गंभीर दखल सहायक निबंधक करणार बेदाणा सौद्यांची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 1:55 PM

बेदाणा उधळणीची सहायक निबंधक रंजना बारहाते सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करणार आहेत. तासगाव बाजार समितीशी त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.

तासगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा उधळण करून अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू आहे, अशी तक्रार मनसेचे नेते अमोल काळे यांनी दिली आहे.

यासंबंधी बेदाणा उधळणीची सहायक निबंधक रंजना बारहाते सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करणार आहेत. तासगाव बाजार समितीशी त्यासंबंधी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.

अमोल काळे यांनी तक्रारीत सांगितले की, बेदाणा उधळणीतून अडत्यांकडून वर्षाकाठी सुमारे दहा कोटींची लूट केली जात आहे. वर्षाला एक हजार टन बेदाण्याची उधळण होते.

यातून अडत्यांचा कोट्यवधी रुपये कमावण्याचा कारभार चालू आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला बेदाणा सौद्यामध्ये उधळून तो पायांखाली तुडविला जातो. १५ किलोंच्या बेदाण्याच्या बॉक्समधून सरासरी तीन किलो बेदाण्याची उधळण केली जाते.

सौद्यात हवा तो दर नाही मिळाला तर पुन्हा पुढच्या सौद्यावेळी अशीच मालाची उधळण केली जाते. संपूर्ण हंगामात सुमारे तीन ते चार हजार कलमांचा सौदा होतो. जितकी कलमे तितके बॉक्स फोडून मालाची उधळण होते.

शेतकऱ्यांची व्यापारी व खरेदीदार यांच्या साखळीने पिळवणूक होत असून, सावकारी जोरात सुरू आहे. याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी काळे यांनी केली होती. यावर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सहायक निबंधक यांच्याशी पत्रव्यवहार करत 'बेदाणा उधळणीची प्रत्यक्ष पाहणी करून काळे यांच्या तक्रारीचा अहवाल पंधरा दिवसांत द्या,' असे आदेश दिले आहेत.

सहायक निबंधक रंजना बारहाते सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून बेदाणा उधळणीची पाहणी करणार आहेत. तासगाव बाजार समितीशी त्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

हजार टनाची उधळणसौद्यानंतर खाली पडलेला बेदाणा अडतेच गोळा करतात. हंगामात एका सौद्यात सुमारे १०० टनांपर्यंत उधळण केलेला बेदाणा खाली पडलेला असतो, असे वर्षभरात १२० ते १३० सौदे होतात. वर्षाला तब्बल एक हजार टन बेदाण्याची उधळण होते. उधळण झालेला बेदाणा अडते स्वतः ताब्यात घेऊन, पॉलिश करून तो पुन्हा विकतात.

टॅग्स :द्राक्षेबाजारसांगलीतासगाव-कवठेमहांकाळमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती