Lokmat Agro >बाजारहाट > कापसाची अवस्था बिकटच! जाणून घ्या आजचे दर

कापसाची अवस्था बिकटच! जाणून घ्या आजचे दर

The condition of cotton is dire! Know today's rates | कापसाची अवस्था बिकटच! जाणून घ्या आजचे दर

कापसाची अवस्था बिकटच! जाणून घ्या आजचे दर

राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर?

राज्यभरातील कापसाला आज किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

कापसाचे दर दिवसेंदिवस कमी होत असून आज एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला नाही. तर आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, आज ए.के.एच.४ लांब स्टेपल, एच ४ मध्यम स्टेपल, लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ४०० रूपये प्रतिक्विंट सरासरी दर मिळाला आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी दर म्हणजे ७ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त कापसाची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये तब्बल १४ हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून येथे ६ हजार रूपये प्रतिक्विंटल किमान दर मिळाला आहे. तर ६ हजार ९०० रूपये कमाल दर मिळाला आहे. 

जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2024
अमरावती---क्विंटल70655066506600
भद्रावती---क्विंटल1414635067506550
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल733600068006675
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल860674068006775
अकोलालोकलक्विंटल108692070117000
उमरेडलोकलक्विंटल653620067006450
देउळगाव राजालोकलक्विंटल2750645068956700
काटोललोकलक्विंटल425640067506500
हिंगणालोकलक्विंटल50660067506650
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2525650069906800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल14000600069806400
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2150650070006850

 

Web Title: The condition of cotton is dire! Know today's rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.