Join us

कापसाच्या दरातील घसरण सुरूच! आज किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 9:36 PM

आज दराज्यातील केवळ दोन बाजार  समित्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे.

आज राज्यातील केवळ दोन बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर राज्यातील उर्वरित बाजार समित्यांमध्ये ६ हजार ते ६ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळत आहे. लांब धाग्याच्या कापसाला केंद्र सरकारकडून ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल दर जाहीर झालेला असतानाही महाराष्ट्रात कापसाची ही स्थिती आहे. मागच्या दोन आठवड्यापासून कापसाच्या दरातील घसरण सुरूच आहे.

दरम्यान, आज ए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल, एच-४ - मध्यम स्टेपल, एल. आर.ए - मध्यम स्टेपल, लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल या वाणाच्या कापसाची आवक झाली होती. हिंगणघाट येथे सर्वांत जास्त ८ हजार क्विंटल मध्यम स्टेपलच्या कापसाची आवक झाली होती. तर या ठिकाणी किमान ६ हजार ते कमाल ७ हजार १४५ रूपये दर मिळाला असून सरासरी ६ हजार ५०० रूपये दर मिळाला. 

संगमनेर बाजार समितीत सर्वांत कमी केवळ ६ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. किमान दर केवळ ५ हजार रूपये होता. तर अकोला बोरगाव मंजू येथे सर्वांत जास्त सरासरी दर ७ हजार २१७ रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. या बाजार समितीमध्ये आज राज्यातील उच्चांकी ७ हजार ४५० रूपये हा उच्चांकी दर होता.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/12/2023
संगमनेर---क्विंटल100500070006000
सावनेर---क्विंटल3000665066756675
भद्रावती---क्विंटल580683070206925
पांढरकवडाए.के.एच. ४ - मध्यम स्टेपलक्विंटल255662068006700
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1157660067006660
धामणगाव -रेल्वेएल. आर.ए - मध्यम स्टेपलक्विंटल1900630069006500
अकोलालोकलक्विंटल100628070116645
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल98698474507217
उमरेडलोकलक्विंटल566640068806700
देउळगाव राजालोकलक्विंटल2371600070806800
वरोरालोकलक्विंटल2706650070216800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1416665070206800
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1650645070006900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8000600071456500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल52660068006700
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल4640620071957050
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल325680070006900
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डकापूस