Join us

हळदीच्या कोच्यालाही वाढली मागणी, किलोमागे मिळताहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 2:15 PM

महाराष्ट्रात सर्वात अधिक होते कोचा हळद, हळदीनंतर अखेरचा खर्च निघत असल्याने शेतकरी समाधानी..

Black Turmeric: बाजारपेठेत हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून दिवसेंदिवस हळदीच्या दरात वाढ होत चालली आहे. मागील आठवड्यात १२ हजार रुपये क्विंटल विकली गेलेली हळद या आठवड्यात १७ हजार ८९० रुपये क्विंटल गेल्याने हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचसोबत कोचालाही मागणी वाढल्याने त्याचेही दर वाढले आहे.

मागील वर्षात ८० ते ६० रुपये विकला गेलेला कोचा यंदा मात्र १४० रुपये किलो विकला जात आहे. त्यामुळे हळदीच्या अखेरचा खर्च कोचाच्या माध्यमातून येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षात जेमतेम हळद लागवड केलेली दिसून येत आहे. मात्र, मागील वर्षात हळदीवर अनेक रोगाने ग्रासले होते. हळदीवर करप्यासह विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हळद काढणीला सुरुवात केली आहे परंतु हळदीच्या उत्पादनात २० ते १५ टक्क्यांची घट झाली असली तरी बाजारपेठेत हळदीला चांगला दर मिळत असल्याने तसेच कोचाच्या उत्पन्न चांगले मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळत आहे. बाजारात विक्रीसाठी पाठविली जात आहे.

बेण्यापासून तयार होतो कोचा

  • शेतकरी एका एकरात दहा ते बारा क्विंटल हळदीच्या बेण्याची लागवड करतात केलेल्या बेण्यापासून कोचा तयार होतो. कोचाला बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने यंदा १०० ते १४० रुपये विकला जात आहे.
  • कोचा मेडिकलसह विविध ठिकाणी महत्त्वाचे असल्याने त्याला चांगली मागणी असते. त्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. हळदीला लागणारे अखेरचा खर्च कोचाच्या माध्यमातून निघतो यंदा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा प्रथमच हळदीला व कोचाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी दिसून येत आहे. 

कोचा हळद म्हणजे काय?

लागवड करताना लावलेली हळद जी कालांतराने जमिनीमध्ये सोडून वाळून जाते याला कोचा हळद म्हणतात. शेतात जमिनीमध्ये कुजलेली काळी हळद यांचे महत्त्व काही वेगळेच आहे. पिवळ्या हळदीपेक्षाही या काळ्या हळदीला मागणी सोबतच भाव सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहे. काळी हळद ज्या वनस्पतीपासून येते ती एक बारमाही औषधी वनस्पती आहे ज्याला लालसर किनार असलेली फिकट पिवळी फुले असतात.

टॅग्स :बाजारशेती