Join us

घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 3:01 PM

निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील यावर्षीचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

खानापूर : निर्यातक्षम द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील यावर्षीचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. भागातील उशिरा छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागा वगळता इतर सर्व बागातील द्राक्ष हंगाम संपला आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईची भीती असून सुद्धा शेतकऱ्यांनी धाडसाने द्राक्ष बागांच्या छाटण्या घेतल्या होत्या. त्यातच डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, मात्र त्यातून सावरून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा फुलवल्या.

यावर्षी निर्यातक्षम द्राक्षांचा दर ८० ते १० रुपये किलोच्या दरम्यान राहिला तर देशांतर्गत मालाला सुरुवातीला कमी भाव होता मात्र शेवटच्या टप्प्यात सरासरी ४० ते ५० रुपये किलोच्या दरम्यान दर राहिला त्यामुळे कोरोनापासून नुकसान सोसणाऱ्या द्राक्ष बागायतदारांना यावर्षी द्राक्ष शेतीतून चांगला नफा मिळाला आहे.

त्यामुळे दाक्ष बागायतदार जोमाने पुढील हंगामाच्या तयारीला लागले आहेत. द्राक्ष हंगामाच्या शेवटच्या काळात दरातील घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला.

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डसांगलीखानापूरशेतकरीशेती