Join us

उन्हाचा चटका वाढलाय, लिंबाला काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 04, 2024 3:53 PM

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान लिंबू सरबतासाठी नागरिक बाजारात धाव घेत असून आवक घटल्याने लिंबाचा दर वाढला आहे.

आज सकाळच्या सत्रात पुणे बाजार समितीत सर्वाधिक लिंबाची आवक होत असून 271 क्विंटल लोकल लिंबाची आवक झाली. यावेळी सर्वसाधारण 6 हजार 250 ते 7 हजार 300 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला.

कोल्हापुरात लिंबाला सर्वाधिक दर मिळत असून क्विंटल मागे सर्वसाधारण 8500 ते 11 हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. अहमदनगर बाजारपेठेत आज 16 क्विंटल लिंबाचे आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांचा साधारण दर मिळाला.

शेतमाल: लिंबू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2024
अहमदनगर---168000102509000
छत्रपती संभाजीनगर---20700090008000
जळगाव---22300060004500
जळगावलोकल25700080007500
कोल्हापूर---143500110008500
मंबईलोकल1782250040003200
नागपूरलोकल60500060005750
पुणेलोकल271520073006250
सोलापूर---5800132
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2210
टॅग्स :बाजारमार्केट यार्ड