Join us

मुंबई-पुण्यात हरभऱ्याला सर्वोच्च दर, सकाळच्या सत्रात कोणत्या बाजार समितीत किती आवक?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 27, 2024 2:33 PM

राज्यात आज सकाळच्या सत्रात 4397 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.

राज्यात मागील दोन आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक वाढली असून चाफा, गरडा, लाल, पिवळा, काट्या, बोल्ड, जंबू अशा विविध जातींसह लोकल व हायब्रिड हरभरा बाजारात विक्रीसाठी येत आहे.

राज्यात आज सकाळच्या सत्रात 4397 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी मुंबई व पुणे बाजार समितीत हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळाला. आज मुंबईत 984 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती. क्विंटलमागे सर्वसाधारण 7500 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला. तर पुणे बाजार समितीत 42 क्विंटल हरभऱ्याला सहा हजार सातशे रुपये दर मिळाला. 

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक हरभऱ्याची आवक अमरावती बाजार समितीत झाली. यावेळी 3193 क्विंटल हरभरा बाजारात विक्रीसाठी आला होता.क्विंटल मागे सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला .

जाणून घ्या कोणत्या बाजार समितीत काय मिळतोय हरभऱ्याला भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/03/2024
अमरावतीलोकलक्विंटल3193550058005650
बुलढाणालोकलक्विंटल13490051505100
चंद्रपुर---क्विंटल106510053305271
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल10533153315331
धाराशिवलोकलक्विंटल2540054005400
धाराशिवकाट्याक्विंटल50540054005400
हिंगोलीलालक्विंटल139515052505200
जळगाव---क्विंटल45490051515061
मंबईलोकलक्विंटल984580085007500
नागपूरलोकलक्विंटल51480051705025
नांदेड---क्विंटल48528053795330
नांदेडलालक्विंटल22560056005600
नाशिककाट्याक्विंटल60365253255161
परभणीलोकलक्विंटल2400052514000
पुणे---क्विंटल42620072006700
सांगलीलोकलक्विंटल14556058805730
सोलापूर---क्विंटल48520054115300
सोलापूरलोकलक्विंटल42500054005200
यवतमाळचाफाक्विंटल145533553655350
यवतमाळलालक्विंटल120530054005350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5136
टॅग्स :तूरबाजार