Join us

मुंबई पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव, उर्वरित भागात कसा दर?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 25, 2024 3:19 PM

उर्वरित बाजारसमितीेमध्ये कशी आहे आवक? कसा मिळतोय बाजारभाव?

राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये गव्हाची  आवक होत आहे. आज मुंबई पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने सांगितले.

मागील आठवड्यापासून गव्हाला साधारण २००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दरम्यान आज राज्यात १२ हजार २६० क्विंटल गव्हाची आवक झाली.

बुधवारी राज्यभरात १७ हजार ५२३ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शरबती, हायब्रीड, कल्याण सोना, पिवळा, लोकल, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींचा गहूबाजारपेठेत विक्रीसाठी आला होता.

आज मुंबई व पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे ४८५० ते ५००० रुपयांचा दर मिळाला.  तर  सोलापूर बाजारसमितीत आज ६७५ क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली. सर्वसाधारण मिळणारा दर ३५४५ रुपयांच्या दरम्यान होता.

गव्हाचा हमीभाव काय?

रब्बी हंगामासाठी २०२४-२५ या हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत १५० रुपयांनी वाढ केली आहे.  २०२३-२४ या कालावधीसाठी गव्हाचा हमीभाव २१२५ रुपये एवढा होता .हा भाव दिडशे रुपयांनी वाढून आता प्रतिक्विंटल २२७५ रुपये भाव देण्याचे जाहीर  करण्यात आले आहे.

उर्वरित बाजारसमितीेमध्ये कशी आहे आवक

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2024
अहमदनगर२१८९65235023502350
बुलढाणालोकल12200028502500
छत्रपती संभाजीनगरबन्सी40232531402950
धुळेलोकल180210033422700
मंबईलोकल7736260065004550
नागपूरलोकल2000220025002425
नाशिक---10300030003000
परभणीलोकल16180031502501
पुणेशरबती408430054004850
सांगलीलोकल675300040003500
सोलापूर२१८९4354535453545
ठाणेलोकल770300034003200
ठाणेशरबती3280031003000
वाशिम२१८९60225023502300
यवतमाळलोकल281215724822312
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)12260

 

 

टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड