दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. महानगरांमध्ये दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली आहे. एकट्या नागपुरात झेंडू, शेवंती आणि सर्व प्रकारच्या फुलांची दोन दिवसांत सुमारे ३०० टन आवक झाली आहे. झेंडूचे दर मात्र विविध ठिकाणी वेगवेगळे आहेत. ३० रुपयांपासून ते अगदी १०० रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पुणे आणि मुंबईच्या बाजारातही मोठी आवक झाली आहे.
दसरा ते दिवाळीपर्यंत पूजेच्या ठोक बाजारात फुलांचे भाव (किलो) फुलांना जास्त मागणी असते, दसरा आणि दिवाळीच्या तीन दिवसांत फुलांची जास्त विक्री होते. ठाेक बाजारात झेंडूला गेल्या दोन दिवसात ८० ते १२० रुपये भाव मिळाला. तर नागपूर मये ९० ते १०० रुपयांचा दर मिळाला. नाशिक व छत्रपती संभाजीनगरमध्ये ४० ते ६० रुपयांचा प्रतिकिलो झेंडूची विक्री झाली.
आज पुणे बाजारसमितीत ९५६ क्विंटल झेंडूची आवक झाली. झेंडूला कमीत कमी ४ हजार व जास्तीत जास्त ८ हजार रुपये दर मिळाला. दिवाळीच्या तोंडावर झेंडूला मागणी वाढती असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसात जळगाव,छत्रपती संभाजीनगर, पुण्यात झेंडूची मागणी पाहता सरासरी २५०० ते ३००० एवढा होता. आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वाढत्या मागणीनुसार दरही चढे दिसून येत आहेत. यंदा पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना फुलाचे चांगले पीक झाले आहे. मागणी वाढल्याने उत्पादक उत्साही आहेत. दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला लक्ष्मी मूर्ति, केरसुणी व खेळभांडी आदींच्या खरेदीसाठीही नागरिकांनी गर्दी केली होती.