राज्यात आज दिनांक १६ जानेवारी रोजी ३ हजार १४ क्विंटल कापसाची एकूण आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण ६७५० रुपये भाव मिळाला. गेल्या आठवडाभरापासून कापूसबाजारभावाची घसरगुंडी सुरूच असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
गेल्या आठ दिवसांपासून लोकलसह हायब्रीड, मध्यम स्टेपल अशा सर्वप्रकारच्या कापसाला साधारण ६००० ते ६९०० यादरम्यानच भाव मिळत असल्याने कपाशी उत्पादक शेतकरी नाराज आहेत.मागील आठ दिवसात केवळ पाच बाजार समित्यांमध्ये कापसाला सर्वसाधारण ७ हजाराच्या वर भाव मिळाला आहे.
दरम्यान, आज अमरावती बाजारसमितीत ५० क्विंटल कापसाची आवक झाली. त्याला प्रति क्विंटल कमीत कमी ६७०० व जास्तीत जास्त ६७५० रुपयांचा भाव मिळाल्याचे पणन विभागाने नोंदवले. दरम्यान, कोणत्या भागात किती कापसाची आवक झाली? जाणून घ्या..
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
अमरावती | --- | 50 | 6700 | 6750 | 6725 |
सावनेर | --- | 3600 | 6800 | 6825 | 6825 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | 550 | 6600 | 6825 | 6750 |
उमरेड | लोकल | 1138 | 6500 | 6850 | 6650 |
वरोरा-माढेली | लोकल | 1000 | 6500 | 6925 | 6750 |
नेर परसोपंत | लोकल | 46 | 5900 | 5900 | 5900 |
काटोल | लोकल | 230 | 6400 | 6820 | 6700 |