Join us

कापूसदराची घसगुंडी सुरुच! क्विंटलमागे कपाशीला काय मिळतोय सध्या दर?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 16, 2024 4:43 PM

जाणून घ्या आजचे ताजे कापूस बाजारभाव

राज्यात आज दिनांक १६ जानेवारी रोजी ३ हजार १४ क्विंटल कापसाची एकूण आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण ६७५० रुपये भाव मिळाला. गेल्या आठवडाभरापासून कापूसबाजारभावाची घसरगुंडी सुरूच असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

गेल्या आठ दिवसांपासून लोकलसह हायब्रीड, मध्यम स्टेपल अशा सर्वप्रकारच्या कापसाला साधारण ६००० ते ६९०० यादरम्यानच भाव मिळत असल्याने कपाशी उत्पादक शेतकरी नाराज आहेत.मागील आठ दिवसात केवळ पाच बाजार समित्यांमध्ये कापसाला सर्वसाधारण ७ हजाराच्या वर भाव मिळाला आहे.

दरम्यान, आज अमरावती बाजारसमितीत ५० क्विंटल कापसाची आवक झाली. त्याला प्रति क्विंटल कमीत कमी ६७०० व जास्तीत जास्त ६७५० रुपयांचा भाव मिळाल्याचे पणन विभागाने नोंदवले. दरम्यान, कोणत्या भागात किती कापसाची आवक झाली? जाणून घ्या..

 

बाजार समिती

जात/प्रत

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

अमरावती

---

50

6700

6750

6725

सावनेर

---

3600

6800

6825

6825

पारशिवनी

एच-४ - मध्यम स्टेपल

550

6600

6825

6750

उमरेड

लोकल

1138

6500

6850

6650

वरोरा-माढेली

लोकल

1000

6500

6925

6750

नेर परसोपंत

लोकल

46

5900

5900

5900

काटोल

लोकल

230

6400

6820

6700

टॅग्स :कापूसमार्केट यार्डबाजार