Join us

कापसाचा भाव ७ हजार पार, राज्यात कुठल्या बाजारसमितीत सर्वाधिक आवक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:34 PM

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यात १६ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली.

राज्यात सध्या कापसाचे भाव सात हजार पार गेले असून विदर्भातून कापसाची सर्वाधिक आवक होत आहे. बुलढाण्यात लोकल कापसाला सर्वसाधारण ७८५० ते ८००० रुपयांचा भाव मिळत असून उर्वरित ठिकाणीही कापसाचे दर साधारण ६९०० ते ७८०० रुपयांपर्यंत आहेत.

दरम्यान, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यात १६ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली. यावेळी वर्धा बाजारसमितीत ६२७० क्विंटल कापसाची आवक झाली होती. यावेळी सर्वसाधारण दर ६९०० ते ८००० रुपयांच्या दरम्यानच राहिला.

आज दि ९ एप्रील रोजी परभणी बाजारसमितीत ९६० क्विंटल कापसाची आवक झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना मध्यम स्टेपल जातीच्या कापसासाठी ७९४५ रुपयांचा दर मिळाला.

टॅग्स :कापूसबाजार