गेल्या वर्षापासून कापूस उत्पादकांवर आलेली संक्रांत यंदाही कायम असून, कापसाचे दर आता हमीभावापेक्षाही ४०० रुपयांनी खाली आले आहेत. कापसाचे दर ६५०० ते ६७०० रुपयांवर आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला नव्हता; मात्र भाव वाढण्याऐवजी कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरता जात आहेत.
२०२१-२२ या हंगामात कापसाचे दर १० हजारांच्या पुढे गेले होते. मात्र गेल्या वर्षाच्या हंगामानंतर कापसाचे दर कमीच होत आहेत. ऑक्टोबर मध्येो कापसाचे दर ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत होते; मात्र जसजसा हंगामा पुढे सरकत आहे. त्याचप्रमाणे कापसाचे दर हे न वाढता कमी होता जात आहेत. शासनाकडून कापसाला ७ हजार २० एवढा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे; मात्र तेवढा भाव देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
या हंगामातील कापसाचे दर (प्रतिक्विंटलमध्ये)
सप्टेंबर २०२३ | ८ हजार ५०० |
ऑक्टोबर | ८ हजार ते ८२०० |
नोव्हेंबर | ६८०० ते ७५०० |
डिसेंबर | ६६०० ते ७२०० |
जानेवारी २०२४ | ६५०० ते ६७०० |