Join us

Lemon Market आवक कमी असल्याने लिंबाचा भाव वधारला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 12:23 PM

लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात.

पारा ३५ ते ४० अंशांवर गेल्याने सकाळी दहा वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत असून, शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

तर, दुसरीकडे यंदा उन्हाच्या तडाख्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत. एक लिटर पेट्रोल पेक्षा एक किलो लिंबाचे दर वाढले आहेत. 

प्रतिकिलो २०० रुपयांवर- हिवाळ्यात लिंबाचे दर नियंत्रणात होते. मात्र, तापमानात जसजशी वाढ होत आहे, तसतशी लिंबांच्या भावातही वाढ होत आहे.- पाच रुपयाने मिळणारे लिंबू दहा रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. बाजारात लिंबाचे भाव वधारल्याचे दिसून येत आहे.- प्रति किलो २०० रुपयांवर लिंबाचे भाव पोहोचले आहेत. घाऊक लिंबू घेणाऱ्यांना दर कमी करून दिले जातात.- मात्र, एक किंवा दोन लिंबू घेणाऱ्यांना प्रति नग दहा रुपयाने विकत घ्यावा लागतो.- उन्हाळा संपेपर्यंत लिंबूचे दर असेच चढे राहतील, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली. कोल्हापूर, बेळगाव आदी बाजारांतून जिल्ह्यात लिंबाची आवक होत असते.

लिंबूपाणी पिणे फायदेशीरलिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र, उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

किरकोळ बाजारात लिंबूचे दर वाढलेलिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. घाऊक बाजारात लिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत, तर किरकोळ बाजारात एक लिंबू दहा रुपयांना विकला जात आहे.

अधिक वाचा: Soybean Market सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर; बाजारभावात होईल का बदल?

टॅग्स :बाजारमार्केट यार्डफळेशेतकरीशेतीपीक