Join us

नव्या कापसाला मिळतोय फक्त पाच हजाराचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 10:24 AM

भाव वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. यंदा नवीन कापूस निघाला आहे. त्याला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्यावर्षी कापसाला मुहूर्ताचा भाव बारा हजार रुपये मिळाला होता. भाव वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. यंदा नवीन कापूस निघाला आहे. त्याला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघा साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यावर्षी कापूस व्यापाऱ्यांनी ना मुहूर्त काढले ना भाव काढला. सरळ कापसाची खरेदी सुरू केली. बदलत्या वातावरणामुळे एकरी दोन-तीन क्विंटल कापूस येण्याची शक्यता आहे. यातच व्यापारी कापूसही साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत.

टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्डशेतकरी