Lokmat Agro >बाजारहाट > अकलूजच्या बाजारात डाळिंबाला ४५० रुपयांचा भाव

अकलूजच्या बाजारात डाळिंबाला ४५० रुपयांचा भाव

The price of pomegranate in Akluj market is Rs. 450 | अकलूजच्या बाजारात डाळिंबाला ४५० रुपयांचा भाव

अकलूजच्या बाजारात डाळिंबाला ४५० रुपयांचा भाव

उच्चांकी दरामुळे आता अकलूजच्या डाळिंबाला डाळिंब पंढरी' ची म्हणून ओळख होऊ लागली आहे.

उच्चांकी दरामुळे आता अकलूजच्या डाळिंबाला डाळिंब पंढरी' ची म्हणून ओळख होऊ लागली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ऊसाच्या साखर कारखानदारीने सहकार पंढरी म्हणून ख्याती असलेल्या अकलूजला, डाळिंबास उच्चांकी ४५० रुपये किलो दर मिळाला आहे. उच्चांकी दरामुळे आता अकलूजच्या डाळिंबाला डाळिंब पंढरी' ची म्हणून ओळख होऊ लागली आहे.

अकलूज येथील डाळिंब व्यापारी युसूफ रफिक बागवान व मुन्नाभाई चौधरी यांनी गारअकोले येथील शेतकरी संतोष भागवत केचे यांच्या भगवा जातीच्या डाळिंबाला ४५० रूपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. वालचंदनगर येथील शेतकरी विशाल बोंद्रे यांच्या डाळिंबास ४०० रूपये किलो असा उच्चांकी दर मिळाला आहे. ऐन सणासुदीत ४५० रूपयांचा दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आसपासचे इंदापूर, माढा, सांगोला, माण, फलटण येथील बहुतांश शेतकरी वर्ग आपले डाळिंब अकलूज मार्केटला विक्रीस आणत आहेत.

याप्रसंगी संतोष केचे, अमोल गायकवाड वालचंदनगर येथील विशाल बोंद्रे व शेतकरी वर्ग हजर होते. व्यापारी मनोज जाधव, राजू बागवान, अक्षय सोनवणे, सादिक बागवान, धनाजी घाडगे, सागर नागणे, मुन्नाभाई चौधरी, जावेद भाई, युसुफ बागवान, ज्ञानदेव कोकरे, तेजस पाटील, बालाजी इंगळे, नाथा पाटील, अमोल जाधव, रावसाहेब भोसले उपस्थित होते.

वाढीव दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद
वाढीव दर मिळाल्याने सणासुदीच्या काळात शेतकरी वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. आसपासच्या परिसरात अकलूज हे डाळिंब नगरी म्हणून नव्याने नावारूपाला येत आहे.

Web Title: The price of pomegranate in Akluj market is Rs. 450

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.