Join us

लातूरच्या पिवळ्या सोयाबीनसह राज्यात आज असा मिळाला सोयाबीनला भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 06, 2024 4:53 PM

लातूर बाजारसमितीत आज २७०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावेळी क्विंटलमागे सोयाबीनला...

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये १९ हजार४६३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी लोकल सोयाबीनसह पिवळे  व हायब्रीड सोयाबीन बाजारात दाखल झाले होते.

लातूर बाजारसमितीत आज २७०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावेळी क्विंटलमागे सोयाबीनला ४५९२ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. तर वाशिममध्ये  ४००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. हिंगोलीत १०६१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे सर्वसाधारण ४३०० ते ४४०० रुपये भाव मिळत आहे. बहूतांश ठिकाणी हमीभावाहून कमी भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/04/2024
अहमदनगर---20427543254300
अकोलापिवळा2839415544754330
अमरावतीलोकल3685445045354492
अमरावतीपिवळा103435544304400
बीडपिवळा222444045404540
बुलढाणालोकल930400045504300
बुलढाणापिवळा740425044914402
धाराशिव---75452545254525
धाराशिवपिवळा7437545004480
धुळेहायब्रीड3264526452645
हिंगोलीलोकल1000410045004300
हिंगोलीपिवळा61426044004330
लातूर---2700457346114592
लातूरपिवळा906451846074552
नागपूरलोकल831410045404430
परभणीपिवळा54434644034346
सोलापूर---87442545004425
वर्धापिवळा910407544504313
वाशिम---4000417546104425
यवतमाळपिवळा290430044254350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)19463
टॅग्स :सोयाबीनबाजार