Lokmat Agro >बाजारहाट > हळदीचा दर ४ हजारांनी घसरला, गणपतीनंतर पुन्हा वाढण्याची शक्यता

हळदीचा दर ४ हजारांनी घसरला, गणपतीनंतर पुन्हा वाढण्याची शक्यता

The price of turmeric fell by 4 thousand | हळदीचा दर ४ हजारांनी घसरला, गणपतीनंतर पुन्हा वाढण्याची शक्यता

हळदीचा दर ४ हजारांनी घसरला, गणपतीनंतर पुन्हा वाढण्याची शक्यता

हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्टमध्ये १७ हजार ३०० वर पोहोचलेली हळद ११ सप्टेंबर रोजी १२ हजार ५०० रुपयांनी ...

हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्टमध्ये १७ हजार ३०० वर पोहोचलेली हळद ११ सप्टेंबर रोजी १२ हजार ५०० रुपयांनी ...

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोलीबाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्टमध्ये १७ हजार ३०० वर पोहोचलेली हळद ११ सप्टेंबर रोजी १२ हजार ५०० रुपयांनी विक्री झाली. क्विंटलमागे जवळपास चार हजारांनी दर घसरल्याने भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे; परंतु गणेशोत्सवानंतर भाव वधारतील आणि ऑगस्टमध्ये मिळालेल्या दरापेक्षाही जास्त दराने हळद विक्री होईल, अशी शक्यता आहे. येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डात यंदा मराठवाड्यासह विदर्भातून हळदीची आवक झाली. जूनमध्ये ७ ते ८ हजारांदरम्यान हळदीला दर मिळाला. तर १५ जुलैनंतर मात्र भावात वाढ झाली. 

३१ जुलै रोजी येथील मार्केट यार्डात १२ हजार ५५० ते १५ हजारांदरम्यान भाव मिळाला होता. त्यानंतरही जवळपास वीस दिवस हळदीचे दर वधारत राहिले. ४ ऑगस्ट रोजी हळदीला १४ हजार ते १७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यादरम्यान ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्रीविना ठेवली होती, त्यांनी विक्री केली. तर आणखी भाव वाढतील या आशेवर व्यापाऱ्यांनीही चढ्या दराने हळद खरेदी केली. ११ सप्टेंबर रोजी किमान ११ हजार ते कमाल १२ हजार ५५५ रुपये हळदीला दर मिळाला. तर सरासरी ११ हजार ७७७ रुपये भाव राहिला. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

Web Title: The price of turmeric fell by 4 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.