यंदा कापसाच्या हंगामातला पहिला महिना सोडला तर कापसाच्या दराने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय ठेवल्यासारखं चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर मिळण्याच्या अपेक्षेने मागच्या हंगामातील कापूस साठवून ठेवला होता पण अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. पण सध्या कापसाचे दर सुधारल्याचं दिसून येत असून अनेक ठिकाणचे दर हे ७ हजारांच्या वर गेले आहेत. वाढलेले हे दर शेतकऱ्यांना फायद्याचे नसून शेतकऱ्यांकडे असेलला जवळपास ९० टक्के कापसाची विक्री व्यापाऱ्यांना झालेली आहे म्हणून वाढलेले हे दर शेतकऱ्यांसाठी 'वरातीमागून घोडे'च आहेत.
दरम्यान, आज लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये पुलगाव, हिंगणघाट, वरोरा, मनवत आणि सावनेर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील जास्त कापसाचीआवक झाली होती. तर इतर बाजार समित्यांमध्ये केवळ १०० क्विंटलच्या आत तर काही बाजार समित्यांमध्ये १००० क्विंटलपेक्षा कमी पावसाची आवक झाली होती. आज मनवत बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार ६७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून या बाजार समितीमध्ये ३ हजार १०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.
तर आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून या बाजार समितीमध्ये ८ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. सध्या कापसाच्या दरात तेजी दिसत असली तर अनेक शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या अपेक्षेमुळे ठेवलेला कापूस कमी दरात व्यापाऱ्यांना विक्री केला आहे. त्यामुळे या दराचा खूप कमी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
04/03/2024 | ||||||
अमरावती | --- | क्विंटल | 75 | 7150 | 7250 | 7200 |
सावनेर | --- | क्विंटल | 3700 | 6900 | 7000 | 6960 |
मौदा | --- | क्विंटल | 160 | 6800 | 7150 | 6975 |
अकोला | लोकल | क्विंटल | 52 | 7350 | 7550 | 7450 |
मनवत | लोकल | क्विंटल | 3100 | 6600 | 7720 | 7675 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 800 | 7000 | 7730 | 7450 |
वरोरा | लोकल | क्विंटल | 1561 | 6000 | 7400 | 6800 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 753 | 6000 | 7400 | 6800 |
नेर परसोपंत | लोकल | क्विंटल | 2 | 6800 | 6800 | 6800 |
काटोल | लोकल | क्विंटल | 185 | 6400 | 7100 | 6900 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 74 | 6800 | 7150 | 7100 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 8000 | 6000 | 7635 | 6500 |
वर्धा | मध्यम स्टेपल | क्विंटल | 750 | 6550 | 7550 | 7120 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 4800 | 5800 | 7465 | 7300 |