Join us

कापसाला मिळालेला दर म्हणजे वरातीमागून घोडे! आज मिळाला 'एवढा' दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 7:41 PM

राज्यात आज कापसाला किती दर मिळाला हे सविस्तर जाणून घ्या

यंदा कापसाच्या हंगामातला पहिला महिना सोडला तर कापसाच्या दराने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय ठेवल्यासारखं चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर मिळण्याच्या अपेक्षेने मागच्या हंगामातील कापूस साठवून ठेवला होता पण अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. पण सध्या कापसाचे दर सुधारल्याचं दिसून येत असून अनेक ठिकाणचे दर हे ७ हजारांच्या वर गेले आहेत. वाढलेले हे दर शेतकऱ्यांना फायद्याचे नसून शेतकऱ्यांकडे असेलला जवळपास ९० टक्के कापसाची विक्री व्यापाऱ्यांना झालेली आहे म्हणून वाढलेले हे दर शेतकऱ्यांसाठी 'वरातीमागून घोडे'च आहेत.

दरम्यान, आज लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये पुलगाव, हिंगणघाट, वरोरा, मनवत आणि सावनेर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील जास्त कापसाचीआवक झाली होती. तर इतर बाजार समित्यांमध्ये केवळ १०० क्विंटलच्या आत तर काही बाजार समित्यांमध्ये १००० क्विंटलपेक्षा कमी पावसाची आवक झाली होती. आज मनवत बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार ६७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून या बाजार समितीमध्ये ३ हजार १०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.

तर आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून या बाजार समितीमध्ये ८ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. सध्या कापसाच्या दरात तेजी दिसत असली तर अनेक शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या अपेक्षेमुळे ठेवलेला कापूस कमी दरात व्यापाऱ्यांना विक्री केला आहे. त्यामुळे या दराचा खूप कमी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/03/2024
अमरावती---क्विंटल75715072507200
सावनेर---क्विंटल3700690070006960
मौदा---क्विंटल160680071506975
अकोलालोकलक्विंटल52735075507450
मनवतलोकलक्विंटल3100660077207675
देउळगाव राजालोकलक्विंटल800700077307450
वरोरालोकलक्विंटल1561600074006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल753600074006800
नेर परसोपंतलोकलक्विंटल2680068006800
काटोललोकलक्विंटल185640071006900
हिंगणालोकलक्विंटल74680071507100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल8000600076356500
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल750655075507120
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल4800580074657300
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारसोयाबीन