Join us

लाल मिरची गोड झाली! कशामुळे पडलेत भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:32 AM

आंध्र प्रदेश, कर्नाटकात मिरचीचे जास्त उत्पादन

तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरची गोड झाली असा मथळा वाचल्यावर तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल... पण, बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर याची सत्यता लक्षात येते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. यामुळे खवय्यांसाठी ही बातमी गोडच ठरत आहे. मिरची स्वस्त झाली असली तरी सावधान, कारण अतितिखट खाणेही पडू शकते महाग...

कशामुळे लाल मिरची स्वस्त?

सर्वाधिक लाल मिरची उत्पादक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश होय. या राज्यात मिरचीचे उत्पादन यंदा मुबलक प्रमाणात झाले आहे. तसेच, कर्नाटक राज्यातही लाल मिरचीचे उत्पादन समाधानकारक आहे. यामुळे नवीन लाल मिरचीची आवक वाढली व भाव कमी झाले आहेत.

लाल मिरचीचे भाव किती कमी झाले?

तेजा (कर्नाटक)- ३०० ते ३५० रु.

ब्याडगी- ७०० ते ७५० रु

गुंटूर (आंध्र प्रदेश)- ३५० ते ४०० रु.

चपाटा-५०० ते ५५० रु.

रसगुल्ला-९५० ते १००० रु.

हंगामाला सुरुवात

उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. या काळात नवीन मिरची बाजारात येते. भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असल्याने वार्षिक मिरची खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत.-स्वप्नील जैन, व्यापारी

खाणाऱ्यांसाठी रसगुल्ला

• भाजीत तरीदार व घट्टपणा येण्यासाठी चपाटा

• मध्यम तिखटपणा 'गुंटूर' मिरचीत असतो.

• तेजा व गुंटूर मिरची ८० टक्के विकली जाते.

• जास्त तिखट खाणाऱ्यांसाठी कर्नाटकची तेजा मिरची प्रसिद्ध आहे.

• कमी तिखट खाणाऱ्यांनी ब्याडगी, रसगुल्ला ही मिरची खरेदी करावी.

टॅग्स :मार्केट यार्डमिरची