Lokmat Agro >बाजारहाट > गावरान बोरांचा गोडवा झाला कमी, बाजारात अँपल बोरांची चलती 

गावरान बोरांचा गोडवा झाला कमी, बाजारात अँपल बोरांची चलती 

The sweetness of Gavran bores has decreased, Ample bores are moving in the market | गावरान बोरांचा गोडवा झाला कमी, बाजारात अँपल बोरांची चलती 

गावरान बोरांचा गोडवा झाला कमी, बाजारात अँपल बोरांची चलती 

गावरान बोरांपेक्षा आता अँपल बोरांची मागणी वाढल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.

गावरान बोरांपेक्षा आता अँपल बोरांची मागणी वाढल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : हिवाळ्यात आंबट-गोड गावरान बोरांची भल्याभल्यांना आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चिमुकल्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच या गावरान बोरांचे खास आकर्षण असते. परंतु, गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची ही चव दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी शेताच्या बांधावर असणारी बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच अँपल बोरांची आवक होताना दिसत आहे.

संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ व्यापली. मात्र, गावरान बोरांची मजा यात नाही. गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते; पण काळाच्या ओघात अँपल बोरं लप्त होत चालली आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागासह शहरी भागातही गावरान बोरंच मिळत होती आता आधनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या जाती निर्माण करण्यात आल्या खऱ्या; पण यात गावरान बोरांची चव मात्र नाही.

आरोग्यासाठी फायदेशीर... 
पौष्टिकतेच्या बाबतीतही बोरं सफरचंदापेक्षा श्रेष्ठ मानली जातात. मकर संक्रांतीच्या सणाला तर अँपल  बोरांना बाजारपेठेत खास मागणी असते. वाणात ही ऊस, ढाळे, ओच्या यासोबत गावरान बोरांचा मान आहे. आहारातही या बोरांना विशेष महत्त्व आहे. ही गावरान बोरं स्वाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, तसेच बोरांमध्ये अ, क जीवनसत्त्व आदी औषधी गुणधर्म तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे धातू अधिक प्रमाणात आढळत असल्याने शरीराला फायदेशीर ठरतात. 


बाजारात अँपल बोरांची धूम
अँपलबोर' हे मूळ थायलंड देशातील फळपीक असून, भारतात प्रथम पश्चिम बंगाल राज्यात अँपल बोराचे उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर हळूहळू देशाच्या सर्व भागात हे फळपीक घेतले जात आहे. फळ बाजारात विविध फळांबरोबरच आकर्षक अँपल बोर विक्रीसाठी आले आहेत. अँपल बोरचे उत्पादन वाढले असेल तरी पुरेसा भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ विक्रीत शंभर रुपयात अडीच किलो बोरं मिळत आहेत.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: The sweetness of Gavran bores has decreased, Ample bores are moving in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.